Home Breaking News कोरोना अलर्ट : जिल्ह्यात आजवर 220 मृत्यू , अडीच महिन्यात 68 जण...

कोरोना अलर्ट : जिल्ह्यात आजवर 220 मृत्यू , अडीच महिन्यात 68 जण दगावले

बुलडाणा, दि.15: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2093 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1560 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 533 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. उपचारादरम्यान केशव नगर, बुलडाणा येथील 67 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. आजवरच्या बळीची संख्या 220 झाली आहे, तसेच आज 462 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
आजपर्यंत 160592 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 21865 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 21865 आहे.
आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 160592 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 25663 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 21865 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 3578 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 220 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

अडीच महिन्यात 68 जणांचा मृत्यू

मागील वर्षी कोरोना महामारी आली. 1 जानेवारी 2021 अखेरीस जिल्ह्यात कोरोनाने 152 रुग्ण दगावले होते. त्यानंतर 1 फेब्रुवारीच्या 2021 रोजी 169 मृत्यूवर आकडा पोहचला तसेच आजपर्यंत 220 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या आजाराची गंभीरता लक्षात घेता काळजी घेणे गरजेचे आहे.

नियमांचे पालन करा- जिल्हाधिकारी
सध्या कोविडचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोविड विरूद्ध लढण्यासाठी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे किंवा सॅनीटाईज करणे, सोशल डिस्टसिंग पाळणे या त्रि सुत्रींचा उपयोग करावा. त्यासाठी राज्य शासनाने मी जबाबदार अभियान हाती घेतले आहे. या अभियानात सहभागी होत सर्वांनी कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी आज केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here