Home Breaking News 23 मार्च प्रर्यंत लॉकडाऊन वाढविला

23 मार्च प्रर्यंत लॉकडाऊन वाढविला

बुलडाणा : कोरोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ
रोग प्रतिबंधात्मक कायदा, तरतूदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमीत करण्यात आलेली आहे, विभागीय आयुक्त् अमरावती यांनी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता अमरावती विभागातील शहरी व ग्रामीण भागामध्ये प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करुन, सदर भागाच्या सिमा निश्चित करुन सदर क्षेत्रामध्ये, प्रतिबंधीत क्षेत्रासाठी
(Containment Zone) व प्रतिबंधीत नसलेल्या क्षेत्रासाठी (Non- Containment Zone) लागु करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे बाबत निर्देश दिलेले आहे. दरम्यान बुलडाणा जिल्हयातील शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये कोविड-19 या विषाणूजन्य आजारा मुळे बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने मोठया प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी 15 मार्च ते 23 मार्च या कालावधीत निर्बंध कायम ठेवले गेले आहे. हा आदेश बुलडाणा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागासाठी लागू राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here