Home क्राईम महिलेचा विनयभंग

महिलेचा विनयभंग

“https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js”></script>
संग्रामपूर : गेल्या काही दिवसापासून विनयभंग व बलात्काराच्या घटनेत वाढ झाल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील त सोनाळा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमधून महिलांवर अत्याचाराचे तक्रारी चिंतेचा विषय ठरत आहेत. असाच एक प्रकार संग्रामपूर तालुक्यातील लाडणापुर येथे उघडकीस आला आहे. शनिवारी रात्री लाडणापुर येथे येथीलच एका आदिवासी महिलेच्या घरात घुसून एका यूवकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार २६ वर्षीय महिला शनिवारी रात्री घरात तीन वर्षीय मुली सोबत झोपलेली असतांना येथील संजय यशवंत इंगळे वय ३२ वर्षे या युवकाने घरात प्रवेश करून महिलेचे दोन्ही हात पकडून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असता पिडितेने आरोपीला लाथ मारून त्याच्या तावडीतून सुटका केली. याबाबत पिडित महिलेने सर्व हकीकत शेजारच्या महिलेला सांगून सोनाळा पोलिस स्टेशन गाठले. महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी संजय इंगळे याविरुद्ध कलम ४५२, ३५४, ३२३, ५०४, ५०६ भादवि तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानूसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयाने दि. २३ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पुढील तपास प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here