Home Breaking News हे फक्त रविकांत तुपकरच करू शकतात!

हे फक्त रविकांत तुपकरच करू शकतात!

 

बुलडाणा – नेहमी जनतेच्या प्रश्नांची जाण ठेवून त्यांची सोडवणूक करण्यासाठी आक्रमक भूमिका घेणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर आज वीज बिलाच्या मुद्दा घेवून पुन्हा आक्रमक झाले, त्यांनी अभिनव आणि तितकंच आक्रमक आंदोलन केलं, हे फक्त रविकांत तुपकरच करू शकतात, अशी चर्चा यानिमित्ताने बुलडाणा जिल्ह्यातील नागरीक करत आहेत.
वीजबिल थकलेल्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा महावितरणकडून कट करण्यात येत आहे. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, स्वाभिमानीच्या वतीने आज बुलडाण्यातील महावितरणच्या कार्यालयासमोर वीजबंद आंदोलन करण्यात आले. आम्ही अंधारात तर तुम्ही पण अंधारात अशी घोषणाबाजी करत, संघटनेच्या वतीने जिल्हा कार्यालयातील वीज कनेक्शन बंद करण्यात आले. दरम्यान जोपर्यंत शेतकऱ्यांचा विद्युतपुरवठा पुन्हा सुरू करणार नाही, तोपर्यंत आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, पाणी देता येत नसल्याने पीक जळून चालले आहे. जनावरांना देखील पाणी पाजता येत नाही. अशा विविध समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. त्यामुळे महावितरणने पुन्हा शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी महावितरणकडे केली होती. त्यासाठी तुपकर यांच्या नेतृत्वात स्वाभिमानीचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी महावितरणचे अधिक्षक अभियंत दिपक देवहाते यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. मात्र देवहाते यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने, अखेर स्वाभिमानीच्या वतीने महावितरणचाच विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here