Home Breaking News जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 3149 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू ;आजपर्यंत 206 कोरोनाबाधीतांचा...

जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 3149 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू ;आजपर्यंत 206 कोरोनाबाधीतांचा मृत्यू

*कोरोना अलर्ट : प्राप्त 776 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 385 पॉझिटिव्ह*
• 262 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.10 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1161 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 776 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 385 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 303 व रॅपीड टेस्टमधील 82 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 415 तर रॅपिड टेस्टमधील 361 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 776 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 62, बुलडाणा तालुका : घाटनांद्रा 2, इजलापूर 1, वरवंड 1, नांद्राकोळी 1, सुंदरखेड 6, कोलवड 1, पांगरी 1, शिरपूर 2, खामगांव शहर : 36, खामगांव तालुका : लोखंडा 1, गोंधनपूर 1, नागापूर 1, बोथाकाजी 1, चिंचपूर 1, उमरा 10, पळशी बु 3, वर्णा 6, नांदुरा तालुका : नारखेड 1, मलकापूर शहर : 57, मलकापूर तालुका : माकनेर 2, दुधलगांव 1, वडोदा 16, जांभूळधाबा 1, दाताळा 10, वाकोडी 1, वरखेड 6, चिखली शहर : 10, चिखली तालुका : शेलूद 1, काटोडा 1, मेरा बु 1, कव्हळा 1, उंद्री 1, शेलसूर 1, सावरगांव डुकरे 1, किन्होळा 1, एकलारा 1, हातणी 2, शेलोडी 1, सिं. राजा शहर : 4, सि. राजा तालुका : सोनुशी 1, धानोरा 1, पिंपरखेड 1, शेलगांव काकडे 1, साखरखेर्डा 2, मोताळा तालुका : पोफळी 1, दाभा 1, कुऱ्हा 1, उऱ्हा 1,माकोडी 1, किन्होळा 1, पुन्हई 1, शेलगांव बाजार 2, चावर्दा 1, तरोडा 6, पिं. देवी 17, पिं. गवळी 1, तालखेड 1, मोताळा शहर : 1, शेगांव शहर : 30, शेगांव तालुका : चावरा 1, गव्हाण 2, संग्रामपूर तालुका : टाकळी पंच 1,कतरगांव 1, जळगांव जामोद शहर : 1, जळगांव जामोद तालुका : कुरणगड बु 13, खांडवी 2, आसलगांव 1, दे. राजा शहर : 10, दे. राजा तालुका : धोत्रा 1, लोणार शहर : 5, लोणार तालुका : सुलतानूपर 1, पिंपरी खंड 1, मेहकर शहर : 2, मूळ पत्ता वरूड ता. जाफ्राबाद जि. जालना 1, जाळीचा देव जि. जालना 2, नया अंदूरा ता. बाळापूर जि अकोला 2, औरंगाबाद 1, कारंजा राम ता. बाळापूर जि अकोला 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 385 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान डी पी रोड चिखली येथील 55 वर्षीय पुरुष, विटाळी ता. नांदुरा येथील 70 वर्षीय पुरुष व आनंद सोसायटी मलकापूर येथील 78 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 262 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : अपंग विद्यालय 31, स्त्री रूग्णालय 8, सहयोग हॉस्पीटल 4, शेगांव : 25, खामगांव : 27, नांदुरा : 1, दे. राजा : 6, चिखली : 24, मेहकर : 4, लोणार : 3, मोताळा : 1, जळगांव जामोद : 4, सिं. राजा : 21, मलकापूर : 11, संग्रामपूर : 42.
तसेच आजपर्यंत 153300 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 19430 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 19430 आहे.
आज रोजी 4605 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 153300 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 22785 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 19430 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 3149 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 206 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here