बुलडाणा: जिल्ह्यामध्ये आज 579 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत
8 मार्च काल रात्री 12 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यामध्ये 579 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले.विशेष म्हणजे एकट्या चिखली तालुक्यात 151 रूग्ण आढळले आहे. बुलडाणा 68, खामगाव 60 आणि शेगाव तालुक्यात 68 रुग्णांची नोंद आहे आहे.
कोरोनाने जिल्ह्यात कहर सुरू केला असून पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. आरोग्य विभागाने तपासण्या वाढविल्या असून शहरी आणि ग्रामीण भागात सुद्धा नागरिकांचे नमूने घेवून प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठवले जात आहे. त्यामुळे रूग्ण संख्य वाढत आहे दुसरीकडे लसीकरण सुद्धा सुरू आहे.
गत 24 तासात
579 कोरोनापॉझिटिव्ह
▪️बुलडाणा: 68 ▪️खामगाव: 60
▪️शेगाव : 68 ▪️दे. राजा : 49
▪️चिखली : 151 ▪️मेहकर : 39
▪️मलकापूर: 39▪️नांदुरा : 27
▪️लोणार : 13▪️मोताळा : 04
▪️सि. राजा : 25 ▪️जळगाव जा.: 21
▪️संग्रामपूर : 15