Home Breaking News जिल्ह्यात सध्या 2844 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार; आजपर्यंत 201 कोरोनाबाधीतांचा मृत्यू

जिल्ह्यात सध्या 2844 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार; आजपर्यंत 201 कोरोनाबाधीतांचा मृत्यू

कोरोना अलर्ट : प्राप्त 1334 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 517 पॉझिटिव्ह
• 341 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.8: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1851 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1334 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 517 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 487 व रॅपीड टेस्टमधील 30 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1166 तर रॅपिड टेस्टमधील 168 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1334 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा तालुका : अजिसपूर 1, पळसखेड भट 1, सुंदरखेड 2, कळमखेड 1, वरवंड 3, गिरडा 2, येळगांव 1, शिरपूर 2, करडी 1, पिं. सराई 1, चांडोळ 1, बुलडाणा शहर : 78, चिखली शहर : 89, चिखली तालुका : खैरव 4, बोरगांव वसु 2, अमडापूर 3, गोदरी 1, मालखेड 1, पिंपळगांव 1, भालगांव 2, कोळेगांव 1, पेठ 1, धोत्रा नाईक 2, बेराळा 1, केळवद 3, सवणा 5, सोनेवाडी 1, भानखेड 1, किन्होळा 1, पळसखेड जयंती 3, वळती 1, दरेगांव 1, मेरा बु 3, अंबाशी 1, मेरा खु 2, रायपूर 1, मेहकर शहर : 8, मेहकर तालुका : सायळा 5, गोमेधर 1, दुधा 2, जानेफळ 2, देऊळगांव साकर्षा 1, थार 7, मोताळा शहर : 2, मोताळा तालुका : पोफळी 1, तरोडा 1, शेलापूर 1, डिडोळा 1, सिंदखेड लपाली 2, मलकापूर शहर : 54, मलकापूर तालुका : माकनेर 1, दुधलगांव 2, दाताळा 2, लोणवडी 1, निंबारी 1, भाडगणी 1, मोरखेड 3, जांभुळधाबा 2, खामगांव शहर : 40, खामगांव तालुका : सुटाळा खु 4, सुटाळा बु 1, पिंप्राळा 1, घाटपुरी 1, शेगांव शहर : 22, शेगांव तालुका : सगोडा 1, हिंगणा 1, पहुरजिरा 1, संग्रामपूर तालुका : पातुर्डा 2, वरवट बकाल 1, जळगांव जामोद शहर : 7, जळगांव जामोद तालुका : आसलगांव 2, वडशिंगी 2, सुनगांव 1, लोणार शहर : 4, लोणार तालुका : पिंपळनेर 4, गोत्रा 4, पांगरा दराडे 10, हिरडव 24,मांडवा 2, रायगांव 1,किनगांव जट्टू 1, वडगांव तेजन 5, देऊळगांव 3, दे. राजा शहर : 7, दे. राजा तालुका : धानोरा 1, सिनगांव जहा 3, उमरद 1, अंढेरा 1, सिं. राजा शहर : 3, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 6, खैरखेड 1, आडगांव राजा 3, माळ सावरगांव 3, नांदुरा शहर : 3, नांदुरा तालुका : धानोरा 1, विटाळी 1, शेंबा 1, मूळ पत्ता जाळीचा देव जि. जालना 4, पिंपळफाटा ता. जाफ्राबाद जि. जालना 1, मालेगांव जि वाशिम 2, वालसावंगी जि. जालना 4, वाकड पुणे 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 517 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान वरवंड ता बुलडाणा येथील 60 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 341 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : चिखली : 20, खामगांव : 52, बुलडाणा : सिद्धीविनायक हॉस्पीटल 11, अपंग विद्यालय 52, मुलींचे वसतीगृह 4, दे. राजा : 30, मेहकर : 23, लोणार : 5, जळगांव जामोद : 11, सिं. राजा : 17, नांदुरा : 26, मलकापूर : 31, शेगांव : 35, मोताळा : 14, संग्रामपूर : 15,
तसेच आजपर्यंत 150639 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 18776 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 18776 आहे.
आज रोजी 6751 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 150639 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 21821 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 18776 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 2844 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 201 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here