Home Breaking News सुरेश नागेश्वर यांच्या शेतातील जुगारावर छापा; बडे जुगारी गळाला

सुरेश नागेश्वर यांच्या शेतातील जुगारावर छापा; बडे जुगारी गळाला

खामगाव:बुलडाणा जिल्हयातील अवैध धंदयावर कार्यवाही करून समूळ उचाटन करण्यासाठी अरविंद चावरिया, पोलीस अधीक्षक, बुलडाणा यांनी श्री बळीराम गिते पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बुलडाणा यांना आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने श्री बळीराम गिते यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथे
पथके नेमले होती, 6मार्च रोजी प्राप्त गोपनीय माहितीनुसार ग्राम शिरसगांव निळे
परिसरात सूरेश नागेश्वर याने त्याचे मालकीचे शेतात घनशाम भुतडा रा खामगांव यास जुगाराचा अडा चालविण्यासाठी दिला आहे अशा खात्रीलायक खबरेवरून त्या ठिकाणी जावून रेड कार्यवाही केली असता त्या ठिकाणी पुढील नमुद इसम व मुदेमाल मिळून आला आहे.
आरोपितांचे नावे :
1. घनशाम माणिकलाल भूतडा, रा जलालपूरा खामगांव जि बुलडाणा
2. आजमखान अब्दुल रहेमानखॉन रा माखणी ता खामगांव जि बुलडाणा
3. नसिरोदीन अनिसोदीन रा फाटकपूरा ता खामगांव जि बुलडाणा
4. शेख इसाक शेख गुलाब रा जुनाफैल ता खामगांव जि बुलडाणा
5. पुरूषोत्तम केदारमल तिबडेवाल, रा गांधीचौक शेगांव जि बूलडाणा
6. पुरूषोत्तम जग्गनाथ राठी रा केदारनगर खामगांव जि बुलडाणा
7. हिम्मत भगवान रोंजिया रा राठी प्लॉट खामगांव जि बुलडाणा
৪. संतोष चंद्रभान नागरगोजे रा चांदमारी खामगांव जि बुलडाणा
9. गणेश नारायण मुधोळकर रा रेखा प्लॉट खामगांव जि बुलडाणा
10. किसन दगडू माळोदे, रा गजानननगर खामगांव जि बुलडाणा
11. गजानन सूखदेव सोनोने, रा शंकरनगर खामगांव जि बुलडाणा
12. सूरेश नागेश्वर रा गांधीचौक, बारादरी खामगांव जि बुलडाणा (जागा मालक)

या जुगारिना श्री धनकुबेरजी मंदीराचे बाजूला, शिरसगांव निळे शेत शिवारावातून ताब्यात घेण्यात आले. रोख रक्कम 53,720 रू, पाच मोटार सायकल , 11 मोबाईल फोनव जुगार मुदेमाल साहित्य,असा एकूण 2,74,720 रू चा मुदेमाल जप्त करण्यात आला.
सदरची कामगिरी श्री अरविंद चावरिया, पोलिस अधीक्षक, बुलडाणा, श्री हेमराजसिंग राजपूत,अपर पोलीस अधीक्षक, खामगांव, श्री बजरंग बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक, बुलडाणा व श्री बळीरामगिते, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बुलडाणा यांचे मार्गदर्शनात श्री नागेशकुमार चतरकर,
सपोनि, श्री श्रीकांत जिंदमवार, पो उप नि, पोलीस अंमलदार गजानन आहेर, विजय सोनोने, वैभव मगर, सुभाष वाघमारे, सुधाकर बड्डे यांनी पार पाडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here