Home Breaking News बापरे, जिल्ह्यात आजपर्यंत 200 कोरोनाबाधीतांचा मृत्यू

बापरे, जिल्ह्यात आजपर्यंत 200 कोरोनाबाधीतांचा मृत्यू

कोरोना अलर्ट : प्राप्त 1568 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 379 पॉझिटिव्ह

338 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.7 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1947 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1568 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 379 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 274 व रॅपीड टेस्टमधील 105 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 875 तर रॅपिड टेस्टमधील 693 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1568 अहवाल निगेटीव्ह आहेत.

पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : शेगांव तालुका : गौलखेड 1, घुई 1, चिंचोली 13, शेगांव शहर : 20, बुलडाणा शहर : 40, बुलडाणा तालुका : सुंदरखेड 3, तांदुळवाडी 1, पळसखेड भट 1, चिखली शहर : 28, चिखली तालुका : लोणी लव्हाळा 1, अमडापूर 2, किन्होळा 1, शेलगांव 1, चांधई 1, सवणा 1, मेरा 1, शिरपूर 2, खामगांव शहर : 28, खामगांव तालुका : शिर्ला नेमाने 1, सुटाळा बु 1, आडगांव 2, श्रीधर नगर 12, विहीगांव 1, हिवरखेड 9, टेंभुर्णा 3, नांदुरा शहर : 32, नांदुरा तालुका : विटाळी 4, कोळंबा 1, तरवाडी 2, शेंबा 1, वडनेर 5, मलकापूर शहर : 21, मलकापूर तालुका : कुंड खु 2, वडजी 1, वाघोळा 1, विवरा 17, दाताळा 1, तालवाडा 6, दे. राजा तालुका : आळंद 1, अंढेरा 3, कुंभारी 2, सुरा 2, सिनगांव जहागीर 4, नारायणखेड 1, जांभोरा 1, निमखेड 1, दगडवाडी 2, पिंपळगांव 1, दे. मही 4, पिंप्री नंदाळे 2, दे. राजा शहर : 18, जळगांव जामोद तालुका : आसलगांव 3, गाडेगां खु 1, मोताळा तालुका : पिं. देवी 14, धा. बढे 4, पोफळी 1, गोतमारा 4, गोलर 2, पि. गवळी 7, मोताळा शहर : 2, सिं. राजा शहर : 6, सिं. राजा तालुका : जऊळका 1, दुसरबीड 3, शिवणी टाका 1, सवडत 1, शेलगांव काकडे 1, मलकापूर पांग्रा 1, सुजलगांव 1, रताळी 3, मेहकर तालुका : अंत्री देशमुख 1, जानेफळ 2, हिवरा साबळे 1, लोणार शहर : 1, लोणार तालुका : असोला 1, मूळ पत्ता जाळीचा देव जि. जालना 1, यवतमाळ 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 379 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान डोंगरखंडाळा ता. बुलडाणा येथील 72 वर्षीय महिला, विदर्भ हाऊसिंग सोसायटी, बुलडाणा येथील 65 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

तसेच आज 338 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : स्त्री रूग्णालय 16, सिद्धीविनायक हॉस्पीटल 13, अपंग विद्यालय 42, मुलींचे वसतीगृह 1, दे. राजा : 37, चिखली : 21, मेहकर : 43, नांदुरा : 44, जळगांव जामोद : 9, सिं. राजा : 4, संग्रामपूर : 4, मलकापूर : 26, लोणार : 10, खामगांव : 41, शेगांव : 26,

तसेच आजपर्यंत 149305 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 18435 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 18435 आहे.

आज रोजी 7581 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 149305 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 21304 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 18435 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 2669 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 200 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here