Home Breaking News दोन अट्टल चोरटे गजाआड

दोन अट्टल चोरटे गजाआड

घरात घुसून चाकूच्या धाकावर सोन्याची पोत व दोन मोबाइल लंपास केल्या प्रकरणी दोन आरोपी अटक मुद्देमाल जप्त
मलकापूर:- शहरातील नांदुरा रोड वरील एका घरात दोघा चोरट्यांनी खिडकीतून आत मध्ये प्रवेश करून वृद्धेच्या गळ्याला चाकु लावुन तिच्या गळ्यातील सोन्याची पोत व दोन मोबाईल नंबर पास केल्याची घटना दिनांक 24 ऑक्टों 20 रोजी रात्री घडली होती. याप्रकरणी श्रीमती मंगला सुधाकर देशमुख वय 55 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध अ.प. 592/20 कलम 457, 380 भा.द.वि नुसार गुन्हा दाखल केला होता.
            पोलिसांना  मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांनी डीबी पथकाच्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून या गुन्ह्यातील रोहित सुभाष दिपके वय 23, ओम अमोल भालशंकर वय 15 दोघे रा. शिवाजीनगर या दोघांना दि.04 मार्च रोजी अटक केली दोघा आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली, पोलीस तपासादरम्यान दोघा आरोपींकडून गुन्ह्यात चोरलेली सोन्याची आठ ग्रॅम वजनाची पोथ किंमत तीस हजार रुपये,रेडमी कंपनीचे 2 मोबाईल किंमत सहा हजार रुपये असा एकूण 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी डि.बि.पथकाचे पो. उपनिरीक्षक विश्वजीत ठाकुर, सहाय्यक पो.उप.नि.रतनसिंग बोराडे पो.काॅ.संजय पठारे, ईश्वर वाघ, गोपाल तारुळकर, सलीम बर्डे, अनिल डागोर, संतोष कुमावत, सुभाष सरकटे आदींनी तपास करुन सदरचा उघडकीस आणला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here