Home Breaking News आलेख वाढता ;जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 2630 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू

आलेख वाढता ;जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 2630 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू

*कोरोना अलर्ट : प्राप्त 2669 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 837 पॉझिटिव्ह*
• 448 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.6 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3506 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2669 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 837 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 772 व रॅपीड टेस्टमधील 65 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 2063 तर रॅपिड टेस्टमधील 606 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2669 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा तालुका : पाडळी 1, बिरसिंगपूर 2, अंभोडा 1, सुंदरखेड 8, चिंचखेड 1, शिरपूर 1, वरवंड 2, करडी 1, पिंपळगांव 1, चांडोळ 1, बुलडाणा शहर : 105, मोताळा शहर : 8, मोताळा तालुका : तळणी 2, बोराखेडी 2, पिंप्री गवळी 1, सारोळा मारोती 2, कोथळी 1, आडविहीर 1, धा. बढे 4, माकोडी 4, रोहीणखेड 9, कोऱ्हाळा 15, कुऱ्हा 13, मुर्ती 3, खरबडी 1, संग्रामपूर तालुका: भोन 1, वरवट बकाल 1, कवठळ 1, सावळी 1, सोनाळा 46, टुनकी 6, बावनबीर 1, पळशी 7, कोलद 5, वडगांव 4, खिरोडा 13, वसाळी 1, निवाणा 1, सायखेड 1, वरवट 1, शेगांव शहर : 53, शेगांव तालुका: पळशी 1, लासूरा 1, कालखेड 18, खेर्डा 8,जानोरी 2, गौलखेड 1, जलंब 1, बेलुरा 2, जळगांव जामोद शहर : 10, जळगांव जामोद तालुका : आसलगांव 5, मानेगांव 4, वडशिंगी 6, अकोला खुर्द 3, खांडवी 2, झाडेगांव 1, धानोरा 8, कुरणगड बु 27, जामोद 6, सुनगांव 2, पिं. काळे 3, मडाखेड 1, मेहकर शहर : 11, मेहकर तालुका : पार्डा 3, हिवरा साबळे 1, भोसा 1, बाऱ्हई 1, जानेफळ 1, हिवरा आश्रम 2, सावत्रा 2, कळमेश्वर 1, लोणी गवळी 1, गजरखेड 5, नांद्रा 1, डोणगांव 1, चिखली शहर : 47, चिखली तालुका : तोरणवाडा 1, हरणी 1, उंद्री 3, शेलूद 1, खैरव 2, नागणगांव 1, साकेगांव 1,पेठ 1, दिवठाणा 1, वरखेड 11, दहीगांव 1, कोळेगांव 2, मालगणी 3, अमडापूर 1, भालगांव 2, भरोसा 1, कोनड 1, शेलसूर 2, गांगलगांव 1, सावरगांव 1, गिरोली 1, भोकर 1, पांढरदेव 1, खंडाळा 1, खामगांव शहर : 24, खामगांव तालुका : घारोड 2, वर्णा 1, बोथाकाजी 1, विहीगांव 5, उमरा 6, टेंभुर्णा 4, किन्ही महादेव 1, सुटाळा बु 2, घाटपुरी 2, मांडवा 1, हिवरखेड 6, नांदुरा शहर : 50, नांदुरा तालुका : तांदुळवाडी 3, मेंढळी 1, टाकरखेड 3, फुली 3, खैरा 1, शेंबा 6, हिंगणा इसापूर 1, मलकापूर शहर : 34, मलकापूर तालुका: निमखेड 1, लोणवडी 2, दुधलगांव बु 1, दे. राजा शहर : 32, दे. राजा तालुका : कुंभारी 2, सिनगांव जहागीर 5, निमखेड 1, दे.मही 3, अंढेरा 2, उंबरखेड 1, मेहुणा राजा 1, किन्ही पवार 1, सावंगी टेकाळे 1, लोणार तालुका : वडगांव 3, असोला 1, लोणार शहर : 4, सिं. राजा शहर : 21, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 4, शिंदी 4, पळसखेड झाल्टा 1, बोराखेडी 1, गुंज 2, रताळी 2, शेंदुर्जन 2, वाघजई 1, ताडशिवणी 1, दुसरबीड 10, मूळ पत्ता जाळीचा देव जि. जालना 1, वाकड पुणे 1, किवळे पुणे 2 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 837 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान डोणगांव ता. मेहकर येथील 65 वर्षीय पुरूष, वावरे ले आऊट, बुलडाणा येथील 65 वर्षीय पुरूष व पळसखेड ता. चिखली येथील 66 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 448 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : स्त्री रूग्णालय 13, सिद्धीविनायक हॉस्पीटल 7, अपंग विद्यालय 55, दे. राजा : 18, चिखली : 65, मेहकर : 4, नांदुरा : 23, जळगांव जामोद : 19, सिं. राजा : 18, संग्रामपूर : 7, मलकापूर : 31, लोणार : 3, खामगांव : 82, शेगांव : 84, मोताळा : 9,
तसेच आजपर्यंत 147737 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 18097 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 18097 आहे.
आज रोजी 7702 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 147737 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 20925 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 18097 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 2630 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 198 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here