Home बुलढाणा जिल्हा कोरोना अपडेट ऐकावे ते नवल! स्वाब न देताच रिपोर्ट आला पोइटीव्ह

ऐकावे ते नवल! स्वाब न देताच रिपोर्ट आला पोइटीव्ह

बुलडाणा : जिल्ह्यातील मोताळा येथील पंडित देशमुख हे साधारण दुखण्यासाठी शासकीय रुग्णालयात गेल्यावर त्यांना नोंदणी करुण घेत नंतर औषधोपचार करून घरी जाण्यास सांगितल मात्र आठवडारात्यांना कोविड सेंटर मधून आपला कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आला असून आपन तात्काळ भरती होण्यासाठी यावे असा फोन आला. तेव्हा त्यांना धक्काच बसला त्यांनी स्वाब न देता आपला रिपोर्ट पॉजिटिव्ह कसा आला …? हा प्रश्न पडला, ते विचारन्यासाठी कोविड सेंटर गाठल तर त्याना उड़वा उडविचि उत्तर देण्यात आलिये. त्यामुळे जिल्ह्यातील कंट्राती कर्मचारयांच्या भरवशावर चालनारी कोविड यंत्रणा कशी आहे याचा प्रत्यय त्याना आलाय. आता ह्या प्रकारणाची सखोल चौकशी करुण दोषिवर कार्रवाई करण्याची मागणी होत आहे.

पंडितराव हे साधारण आजारावर उपचारार्थ कोविड केंद्रामध्ये आले होते. मात्र तिथे टेस्ट करावी लागेल असे सांगण्यात आले नोंदणी करुण घेतली मात्र कुठलीच टेस्ट न करता ते निघून गेले. त्यांचा नावाचा स्वॅब घेण्याचा ट्युब तयार करण्यात आला होता. त्या ट्युबमध्ये दुसऱ्या नागरिकाचा स्वॅब टाकण्यात आला. शुक्रवारी तो अहवाल पॉझिटिव्ह आला, असे तालुका वैद्यकीय अधिकारी रवींद्र पुरी यांनी फोन वर सांगितले. याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाईल व ज्यांचा अहवाल पंडितरावाच्या नावाने पॉझिटिव्ह आला त्यांना शेधन्याचा प्रयत्न करीत आहोत असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र, पंडितरावाच्या नावाने पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचे नाव,पत्ता व मोबाईल नंबर लिहल्या गेला नसल्याने या रुग्णांला शोधून कसे काढले जाईल असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे , पुन्हा आरोग्य विभागाचा भोंगळ कार्यभार समोर आलाय…

बाईट – पंडित देशमुख, नागरिक

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here