Home धर्म जागरण घरोघरी ‘श्रीं’ चा प्रगटदिन भक्ती भावाने साजरा !

घरोघरी ‘श्रीं’ चा प्रगटदिन भक्ती भावाने साजरा !

◆श्रीं चे मंदिर बंद;भाविक प्रवेशद्वारावर नतमस्तक..

◆संत गजानन महाराजांचा १४३ वा प्रगटदिन

◆शेगावात श्रींचा प्रकट दिन भाविकांनी घरा-घरात केला साजरा..

शेगाव(प्रतिनिधी): कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री संत गजानन महाराज यांचा १४३ व प्रकट दिन उत्सव संत नगरी शेगाव शहरात श्रींच्या भक्ताकडून घराघरात साजरा करण्यात आला.. वैश्विक महामारी कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता यावर्षी पहिल्यांदाच श्री संत गजानन महाराज मंदिर श्रींच्या दर्शनासाठी प्रशासनाच्या निर्देशानुसार बंद ठेवण्यात आलेला आहे तशातच आज ५ मार्च रोजी तिथीनुसार श्री संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन उत्सव श्रींच्या भाविक भक्तांनी घरा-घरात साजरा करावा असे आवाहन प्रशासनाकडून व श्री गजानन महाराज संस्थान तर्फे करण्यात आले होते त्यामुळे शेगाव शहरातील व्यंकटेश नगर परिसरात घराघरांमध्ये सोशल डिस्टंसिंग ठेवून श्रींचा प्रगटदिन उत्सव साजरा करण्यात आला श्रीमती सुशिला देवी त्रिवेदी सौ गीता ताई त्रिवेदी कुमारी सलोनी त्रिवेदी सागर त्रिवेदी यांनी विशेष असे हार फुलांनी श्रींचे मंदिर घरात सजविले आकर्षक रोषणाई करून श्री गजानन महाराज विजय ग्रंथातील २१ अध्याय भक्ती भावपूर्ण वातावरणात वाचन केले यावेळी भजन कीर्तना मुळे संपूर्ण वातावरण गजाननमय झालेले दिसत होते यावेळी श्रींची आरती होऊन सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here