मलकापूर :पुण्यातील तळेगाव पिंपरी चिंचवड येथील एका घरफोडी प्रकरणातील दीड लाखाचे सोने चोरुन विकल्या प्रकरणी अटकेतील आरोपीने मलकापूर येथे मावशीच्या साह्याने सराफा व्यवसायीकास सोने विकल्याच्या संशयावरून पुणे पोलिस आज मलकापुरात दाखल झाली होती, मलकापूर पोलिसांच्या सहकार्याने आरोपीने दाखविलेल्या सराफा व्यावसायिकास पुणे पोलिसांनी आज सायंकाळी सात वाजेदरम्यान त्याचे घरुन ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की दि. 15 नोव्हें 20 मध्ये तळेगाव एमआयडीसी परिसरात लिंग्या उर्फ अजीत वेंक्यटेश पवार वय 30 रा. जेऊर अक्कलकोट ता.सोलापूर याने घरफोडीत सात तोळे आठ ग्रॅम सोने किंमत अंदाजे एक लाख 56 हजार रुपयाचे सोने घटनास्थळावरुन लंपास केले होते,मलकापूर येथील गोविंद विष्णु महाजन विद्यालय समोरील प्रांगणात राहणाऱ्या मावशीच्या सहकार्याने त्याने मलकापूर येथील सराफा व्यवसायिकास ते सोने विकल्याची कबुली त्याने दिल्यावरुन आज पुणे पोलिसांनी मलकापूर येथे दाखल झाले यावेळी आरोपी व त्याची मावशीच्या सांगण्यावरून पुणे पोलिसांनी संशयित सराफा व्यावसायिकास ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे या प्रकरणी पुणे येथील पोलिस निरीक्षक रामदास इंगोले, पो. कॉ.दत्तात्रय बनसोडे पो.ना. धनंजय भोसले,पो.काॅ ज्ञानेश्वर गाडेकर आधी पथक मलकापुर येथे दाखल झाले होते मलकापूर शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांनी पो.कॉ.सलीम बर्डे,पो.काॅ. संजय पठार आदी पोलीस कर्मचाऱ्यां पुणे येथील पोलिसांच्या तपासात सहकार्या कामी पाठविले होते.