Home Breaking News कोरोना पॉझिटिव्ह आकडा 20 हजार!

कोरोना पॉझिटिव्ह आकडा 20 हजार!

बुलडाणा :प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2695 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2249 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 446 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 360 व रॅपीड टेस्टमधील 86 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1610 तर रॅपिड टेस्टमधील 639 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2249 अहवाल निगेटीव्ह आहेत.

*पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :*
शेगाव शहर : 34, शेगांव तालुका : टाकळी विरो 7, खेर्डा 1, सगोडा 1, जलंब 1, पहुरजिरा 3, खामगांव शहर : 34, खामगांव तालुका : पिं. राजा 2, लोणी गुरव 1, लाखनवाडा 1, पळशी 7, सुटाळा बु 7, किन्ही महादेव 15, गारडगांव 4, अटाळी 2, संग्रामपूर तालुका : पांचाळ बु 1, पातुर्डा 1, पळशी झाशी 1, वरवट बकाल 6, सोनाळा 1, वानखेड 5, कोलद 1, बुलडाणा शहर : 34, बुलडाणा तालुका : रायपूर 1, धामणदरी 1, वरवंड 5, सुदंरखेड 4, दहीद 1, मोताळा शहर : 8, मोताळा तालुका : तरोडा 4, पिं. नाथ 7, पान्हेरा 3, बोराखेडी 1, चिखली शहर : 33, चिखली तालुका : किन्होळा 1, आमखेड 1, सावरगांव 2, येवता 1, करतवाडी 1, काळेगांव 1, टाकरखेड मुसलमान 1, उत्रादा 1, कोलारा 1, भोकर 3, शिंदी हराळी 1, मलकापूर शहर : 37, मलकापूर तालुका : दाताळा 1, आळंद 1, पिंपळखुटा 2, वाकोडी 2, नांदुरा शहर : 28, नांदुरा तालुका : निमगांव 2, शेंबा 3, कोळंबा 1, वडनेर 1, मामुलवाडी 1, टाकरखेड 7, शेलगांव मुकूंद 2, नायगांव 4, पोटळी 1, जळगांव जामोद शहर : 11, जळगांव जामोद तालुका : आसलगांव 3, हिंगणा 1, मानेगांव 5, झाडेगांव 1, दे. राजा शहर : 23, दे. राजा तालुका : नागणगांव 2,दे. मही 1,नारायणखेड 1, आळंद 1, पोखरी 1, तुळजापूर 1, सिनगांव जहागीर 5, अंढेरा 3, दगडवाडी 1, उंबरखेड 1, मेहकर तालुका : हिवरा खुर्द 2, जानेफळ 5, सिं. राजा शहर : 13, सिं. राजा तालुका : अंचली 2, कि. राजा 2, उगला 1, शेलगांव राऊत 2, साखरखेर्डा 3, रताळी 2, लोणार शहर : 1, मूळ पत्ता पारशिवणी जि. नागपूर 2, येनगांव ता. बोदवड जि. जळगांव 1, औरंगाबाद 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 446 रूग्ण आढळले आहे.

तसेच आज 581 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
*कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :*
जळगांव जामोद : 158, बुलडाणा : सिद्धीविनायक हॉस्पीटल 6, अपंग विद्यालय 107, स्त्री रूग्णालय 9, मुलींचे वसतीगृह 3, शेगांव : 40,चिखली : 56, खामगांव : 7, दे. राजा : 43, लोणार : 17, मेहकर : 23, नांदुरा : 45, सिं. राजा : 12, मोताळा : 8, मलकापूर : 43.

तसेच आजपर्यंत 144246 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 17293 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 17293 आहे.

आज रोजी 7910 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 144246 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 19980 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 17293 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 2492 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 195 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here