Home Breaking News आज बुलडाणा जिल्ह्यात ‘इतके’ कोरोना बाधीत ,1122 लोकांना लस

आज बुलडाणा जिल्ह्यात ‘इतके’ कोरोना बाधीत ,1122 लोकांना लस

 

खामगाव- आज पहाटे अखेरीस जिल्ह्यात 446 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह (positive) आले आहेत. ही माहिती काल म्हणजेच बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार आहे. दरम्यान काल 1122 लोकांना लस देण्यात आली.

कोरोनाने जिल्ह्यात कहर सुरू केला असून पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. आरोग्य विभागाने तपासण्या वाढविल्या असून शहरी आणि ग्रामीण भागात सुद्धा नागरिकांचे नमूने घेवून प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठवले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असतांनाच आज जिल्ह्यात पून्हा नवे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. दरम्यान, दैनंदिन कोरोनामुक्त रुग्णांच्या तुलनेत नवीन बाधितांची संख्या अधिक असल्याने अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा फुगत चालला आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात राहण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. अनेक प्रतिबंधात्मक पावले टाकण्यात येत आहे. दुसरीकडे लसीकरणही युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. असे असताना रुग्णसंख्या मात्र कमी होताना दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून ३०० ते ४०० दररोज नवीन रुग्णांची भर पडत आहे.

मागील चोवीस तासाची आकडेवारी

बुलढाणा 55
खामगाव 66
शेगाव 60
देऊळगाव राजा 39
चिखली 40
मेहकर 07
मलकापूर 43
नांदुरा 49
लोणार 01
मोताळा 20
जळगाव जामोद 21
सिंदखेड राजा 24
संग्रामपूर 15,
सिद्धिविनायक हॉस्पिटल 03
सहयोग हॉस्पिटल 03

असे रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना संसर्गित रुग्णांचा आजपर्यंतचा एकूण आकडा 19980 झाला असून सद्यस्थितीत जवळपास 2492 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजवरचा कोरोना बाधितांच्या मृत्यूचा आकडा 195 वर जाऊन पोहोचला आहे.

 

जोवर कोरोनावर इलाज सापडत नाही तोपर्यंत नागरिकांना खबरदारीने वागण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे, कोरोनाची लस सुद्धा उपलब्ध झाली असून 1122 नागरिकांना लस दिली गेली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील 15 खासगी हॉस्पिटलमध्ये लवकरच लस दिली जाणार आहे तोवर जे नियम आहेत ते पाळावे लागणार आहेत. त्यात प्रामुख्याने मास्कचा वापर, गर्दी टाळणे, नियमितपणे हात धुणे असे साधे सोपे उपाय आहेत. कोरोनाने घाबरून जायचे नाही मात्र जबाबदारीने वागणे मात्र अत्यावश्यक आहे.

*Date:-04.03.21*

*Total Swab Collection*
RTPCR:- 1258
TRUNAT: 74
RAPID A: 725
TOTAL:- 2057
———————————————-
*Report Recived)*
*TEST* *+VE* *-VE* *POOR*
*RTPCR* : 1919 326 1552 41
*TRUNAT* : 95 34 58 3
*RAPID* : 725 86 639
*TOTAL : 2739 446 2249 44*
———————————-
———————————————-
*PROGRESSIVE STATUS*
Positive Cases:- 19980
Discharged:- 17293
Deaths:- 195
Active Cases:- 2492
———————————————-
*Progressive Sample*
RTPCR – 119054
TRUNAT – 8624
RAPID – 48243
*TOTAL Sample- 175921*
———————————————-
*Positivity Rate* – 11.35 % (Progressive + ve 19980)
Positivity Rate* 16.28 % (Todays +ve . 446)
*Death Rate* _ 0.97 %
*Recovery Rate* :- 86.55 %

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here