Home बुलढाणा जिल्हा कोरोना अपडेट रूग्णालयात 2627 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू, 195 जण दगावले

रूग्णालयात 2627 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू, 195 जण दगावले

*कोरोना अलर्ट : प्राप्त 1989 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 321 पॉझिटिव्ह*
• 294 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.3: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2310 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1989 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 321 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 238 व रॅपीड टेस्टमधील 83 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1191 तर रॅपिड टेस्टमधील 798 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1989 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 35, बुलडाणा तालुका : दुधा 1, सुंदरखेड 1, गिरडा 1, वरवंड 7, उमाळा 1, डोंगर खंडाळा 2, दहिद 3, रायपूर 2, मढ 2, सागवन 1, चिखली तालुका : भालगांव 2, सवणा 4, केळवद 1, वळती 4, भरोसा 2, शेलुद 1, आमखेड 3, हातनी 2, मलशेंबा 1, मंगरूळ 1, बेराळा 2, टाकारखेड हेलगा 6,दे. धनगर 1, खंडाळा 2, वरूड 1, चिखली शहर : 12, सिं. राजा शहर : 7, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 3, मोताळा तालुका : खरबडी 1, शेलापुर 1, खामगांव शहर : 15, खामगांव तालुका : गोंधनपुर 3, जयपूर लांडे 1, अंत्रज 19, उमरा 4, शिरला 1, दे. राजा शहर : 3, दे. राजा तालुका : दे. मही 1, उंबरखेड 1, अंढेरा 3, बायगांव 1, सुरा 2, धोत्रा नंदाई 1, मेहकर शहर : 22, मेहकर तालुका : जानेफळ 27, डोणगाव 3, शहापूर 2, थार 1, कळमेश्वर 2, मलकापूर शहर : 34, मलकापूर तालुका : विवरा 1, उमाली 1, नांदुरा शहर : 16, नांदुरा तालुका : पोटली 1, पतोंडा 2, आलम पूर 1, चांदुर बिस्वा 5, खैरा 1, लोणार तालुका : हिरडव 2, लोणार शहर : 3, जळगांव जामोद तालुका : वाडशिंगी 1, खांडवी 1, जळगांव जामोद शहर : 1, शेगांव शहर : 20, शेगांव तालुका : भोनगांव 1, जलंब 1, मोताळा शहर :1, मूळ पत्ता भुसावळ, जि. जळगाव येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 321 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान मेहकर येथील 54 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 294 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव : 40, बुलडाणा : अपंग विद्यालय 70, विनायक हॉस्पीटल 10, दे. राजा : 27, लोणार : 10, चिखली : 76, नांदुरा : 7, सिं. राजा : 1, मोताळा : 7, मलकापूर : 13, जळगांव जामोद : 12, मेहकर : 13.
तसेच आजपर्यंत 141997 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 16712 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 16712 आहे.
आज रोजी 8592 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 141997 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 19534 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 16712 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 2627 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 195 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here