Home Breaking News लाचखोर कारकून अडकला ACB च्या जाळयात!

लाचखोर कारकून अडकला ACB च्या जाळयात!

एक लाखांची लाच, कारकून अटकेत

बुलडाणा : एक लाख रुपयांची लाच मागणारा
सिंदखेडराजा उपविभागीय कार्यालयातील कारकून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे.
बुलडाणा येथील व्यक्तीने तक्रार दिली की, मी प्रचार व प्रसिद्धी कंत्राटदार असून त् केलेल्या शासकीय कामकाजाचे प्रलंबित बिल वरिष्ठांना सादर करुन बिलाची रक्कम तक्रारदार यांना मिळवून देण्यासाठी दिपक शंकरराव गोरे , वय- ४२ वर्षे, पद- अव्वल कारकून,( वर्ग -3), नेमणूक- उपविभागीय अधिकारी कार्यालय,सिंदखेडराजा याने 1 लाख रुपये लाच मागितली. त्यावरून सापळा रचण्यात आला. पो.उपअधिक्षक श्री. संजय चौधरी.
पोलीस नाईक -श्री विलास साखरे, प्रवीण बैरागी, पो.शि.- श्री विजय मेहेत्रे,
विनोद लोखंडे, चालक पो. शि. श्री मधुकर रगड, अर्शीद शेख यांनी श्री. विशाल गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र व श्री. अरुण सावंत, अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,अमरावती परिक्षेत्र, यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीस 50 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

▶️ सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा
संपर्क क्रमांकव- 8888768218
टोल फ्री क्रमांक – 1064
————————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here