Home Breaking News आज सूरज पे मंगळ भारी!

आज सूरज पे मंगळ भारी!

आज पहा कृतिका आणि मंगळ ग्रह

खामगाव : आज ३ मार्चच्या संध्याकाळी पश्चिम आकाशात कृत्तिका या देखण्या तारकागुच्छाच्या जवळ तांबूस ग्रह मंगळ असे विलोभनीय दृश्य दिसणार आहे.साधारणपणे दर २ वर्षांनी अशी मंगळ-कृत्तिका युती होते.पण ३ मार्चला मंगळग्रह कृत्तिकेच्या दक्षिणेला २.६ अंश इतक्या जवळ दिसणार आहे.या दोघांची अशी अगदी जवळून युती या आधी २०जानेवारी १९९१ ला (१.७ अंश) झाली होती तर या नंतर मंगळाला कृत्तिकेच्या इतक्या जवळ बघण्यासाठी ४ फेब्रुवारी २०३८ची (२अंश) वाट पहावी लागणार आहे.

कृत्तिका (Pleiades)-M45 हा साध्या डोळ्याने दिसू शकणारा प्रसिद्ध खुला तारकागुच्छ (Open star cluster)आहे. यातील २५० ताऱ्यांपैकी ६ तारे डोळ्याने दिसतात तर ७५ तारे दुर्बिणीतून सहज दिसू शकतात.भारतीय परंपरेत याला कृत्तिका नक्षत्र मानले असून यातले ६ तारे – अंबा, दुला ,नितंती ,मेघदन्ति,अभ्रयन्ति ,वर्षायन्ति या सप्तर्षींच्या पत्नी मानल्या गेल्या आहेत.आकाशात कृत्तिका शोधण्यासाठी मृग तारकासमूहाची मदत होते. मृगाच्या बेल्टवरील तीन तार्यांपासून वृषभेतील तेजस्वी रोहिणी तार्यापर्यंत काल्पनिक रेषा काढून पुढे वाढवली कि तार्यांच्या एक पुंजका दिसतो .तो म्हणजे कृत्तिका तारकागुच्छ.

२४ फेब्रुवारीला वृषभ राशीत आलेला मंगळ २८ फेब्रुवारी पासून कृत्तिकेच्या जवळ दिसायला लागला आहे ३).मार्चच्या पहिल्या आठवडाभर हे एकमेकांच्या जवळ दिसतील. आज ३ मार्चला मंगळ कृत्तिकेच्या सगळ्यात जवळ २.६ अंश दक्षिणेला दिसेल.सूर्यास्तानंतर साधारण मध्यरात्रीपर्यंत पश्चिम आकाशात
साध्या डोळ्यांनी हे दृश्य बघता येईल. दुर्बीण किंवा द्विनेत्री असल्यास कृत्तिकेचा सुंदर आकार, त्यातील इतर तारे व जवळ तांबूस मंगळ असे दृश्य फारच विलोभनीय दिसेल अशी माहिती खगोलशास्त्र अभ्यासक गजानन अहीर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here