शेगाव: कोरोना काळातील वीज बिल माफ व्हावे तसेच सक्तीची वसुली थांबवावी वीज बिलात सवलत मिळावी व वीज कनेक्शन तोडू नये खंडित केलेला वीज पुरवठा परत जोडण्यात यावा. करिता स्वाभिमानी शेतकरी संघटना सातत्याने आंदोलन करीत असून सोमवारी विधिमंडळाच्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीजबिल व वीज तोडणी च्या प्रश्नावर त्वरित निर्णय घेऊन राज्यातील घरगुती आणि शेतकर्यांचे कनेक्शन तोडले जाणार नाही अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्यजनतेला दिलासा मिळाला आहे. स्वभिमानी शेतकरी संघटना वीजेच्या प्रश्नावर आग्रही होती. त्याळे स्वाभिमानीचे मागणीला यश मिळताना दिसत आहे, असे मत स्वाभिमानीचे नेते प्रशांत डीक्कर यानी व्यक्त केलं आहे.