Home बुलढाणा जिल्हा कोरोना अपडेट आज इतके कोरोना बाधीत ;या तालुक्यांनी गाठलं आकड्यांमध्ये ‘अर्धशतक’

आज इतके कोरोना बाधीत ;या तालुक्यांनी गाठलं आकड्यांमध्ये ‘अर्धशतक’

खामगाव- आज जिल्ह्यात 321 रुग्ण पॉझिटिव्ह (positive) आले आहेत. बुलडाणा, खामगाव आणि मेहकर या तीन तालुक्यांनी रुग्णाच्या आकड्यांमध्ये अर्धशतक ओलांडले आहे.

कोरोनाने जिल्ह्यात कहर सुरू केला असून पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी लागून केली सकाळी 9 ते संध्याकाळी 5 प्रतिष्ठाने सुरु असतात. दरम्यान आरोग्य विभागाने तपासण्या वाढविल्या असून शहरी आणि ग्रामीण भागात सुद्धा नागरिकांचे नमूने घेवून प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठवले जात आहे.

जोवर कोरोनावर इलाज सापडत नाही तोपर्यंत नागरिकांना खबरदारीने वागण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे, कोरोनाची लस सुद्धा उपलब्ध झाली असून काही दिवसांनी खाजगी आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये लस येईल असे सांगितले जात आहे. तोवर नागरिकांना संयम ठेवावा लागेल. त्यासाठी जे नियम आहेत ते पाळावे लागणार आहेत. त्यात प्रामुख्याने मास्कचा वापर, गर्दी टाळणे, नियमितपणे हात धुणे असे साधे सोपे उपाय आहेत. कोरोनाने घाबरून जायचे नाही मात्र जबाबदारीने वागणे मात्र अत्यावश्यक आहे.

▪️बुलडाणा: 56 ▪️खामगाव: 51
▪️शेगाव : 21 ▪️दे. राजा : 12
▪️चिखली : 48 ▪️मेहकर : 58
▪️मलकापूर: 33▪️नांदुरा : 24
▪️लोणार : 03▪️मोताळा : 00
▪️सि. राजा : 09 ▪️जळगाव जा.: 02
▪️संग्रामपूर : 00
▪️सिद्धिविनायक हॉस्पिटल: 03
▪️सहयोग हॉस्पिटल: 01

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here