Home Breaking News मलकापूर मध्ये अग्नीतांडव ; लाखोचे नुकसान

मलकापूर मध्ये अग्नीतांडव ; लाखोचे नुकसान

मलकापुर येथे मध्यरात्री रात्री अग्नी तांडव.

सहा दुकाने आगीत भस्मसात. लाखोंचे नुकसान.

काल रात्रीच्या दोन वाजेच्या सुमारास मलकापूर येथील सिनेमा रोड वरील सहा दुकानांना भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली आग एवढी भीषण होती की या आगीत सहाही दुकाने जळून भस्मसात झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले नगरपालिका अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमाने आग आटोक्यात आणण्यात आली

मलकापूर शहरातील मुख्य रस्त्यावर येत असलेल्या सिनेमा रोड वर काल मध्यरात्रीच्या दोन वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत सिनेमा रोडवरील सत रमेती राम टोबॅको, सुरजमल ॲन्ड कंपनी, गांधी बुक डेपो, हारूण अजीज यांची दुकाने व गोडाऊन संपुर्ण जळुन खाक झालेत तर अग्रवाल स्टोअर्स व हिरालाल दिपचंद अग्रवाल यांचे ही मोठे नुकसान झाले मध्य रात्रीला लागलेल्या या आगीने परिसरात एकच धावपळ उडाली घटनेची माहिती त्वरित मलकापूर अग्निशमन दलाला देताच अग्निशनमन व पोलीस विभाग घटनस्थिल दाखल होऊन आग विजवण्याचा प्रयत्न केला. पण आगीने आपले रौद्र रूप धारण करून एक एक करत लगतच्या दुकानांना देखील आपल्या लपेट्यात घेतल्याने परिसरीतल सहा दुकाने व गोडाऊन जळून खाक झाले पोलीस व अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमाने अखेर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीमध्ये लाखो रुपयाने नुकसान झाले. सदर आग विजवण्यासाठी न.प.अग्निशमन दलाचे वासुदेव भोपळे, सुरजसिंह राजपुत, दिपकसिंग राजपुत, निलेश चोपडे, शुभम राजपुत तसेच मलकापूर पोलीस स्टेशन चे पोलीस सहाय्यक पो.निरीक्षक ठाकरे, ए एस आय दिपक चंद्रशेखर, पोलीस कर्मचारी शैलेश सोनोने, अनिल डागोर, सलिम बर्डे, मिलिंद ताकतोडे यांनी अथक परिश्रम घेतले.

पहा व्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here