Home खामगाव विशेष धुरामुळे शहर व परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

धुरामुळे शहर व परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

डम्पींग ग्राऊंडवरील आगीच्या घटनेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
न.प. प्रशासनाविरुध्द कठोर कारवाई करा,  दिलीपकुमार सानंदा यांची पर्यावरणमंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी
खामगांव:-
 खामगांव शहरालगत रावण टेकडी नजीक असलेल्या डम्पींग ग्राऊंडला आग लागण्याचे सत्र सुरुच असून दि.२६ फेब्रुवारी रोजी डम्पींग ग्राऊंड वरील कचऱ्याला पुन्हा आग लागली. वारंवार आगी लागण्याच्या घटनामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडून आगीमुळे   निर्माण होणाऱ्या धुरामुळे शहर व परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येवुन त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. ज्यांच्याकडे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी आहे ते नगर पालीका प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने उघडयावर कचरा जाळण्यावर पुर्णपणे बंदी घातली असतांना डम्पींग ग्राऊंडवर मोठ्या प्रमाणात कचरा जाळल्या जात असल्यामुळे आगीच्या घटना घडत आहे. यासाठी खामगांव परिषद आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी व घनकचरा व्यवस्थापन कंत्राटदारासह नगर पालीका प्रशासन जबाबदार असून हरित प्राधिकरणाच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी कचरा जाळल्याच्या प्रकरणाची सखोल चैकशी करुन त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करावी अशी मागणी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी पर्यावरणमंत्री ना.आदित्य ठाकरेसह वरीष्ठांकडे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, खामगांव शहरातुन संकलीत होणारा घनकचरा डम्पींग ग्राऊंड वर टाकला जातो. या कचऱ्याला वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहे.या अगोदर सुध्दा परिसरातील नागरिकांनी आगीच्या घटनांबाबत नगर पालीकेकडे तक्रारी केल्या असतांना नगर पालीका पशासनाचे त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. दि.२४ फेब्रुवारीच्या रात्री सुध्दा सदर डम्पींग ग्राऊंडवरील कचऱ्याला मोठी आग लागली होती. त्यामुळे घातक धुरांचे लोट परिसरात पसरल्याने  गोपाळ नगर, किसन नगर, पंजाब ले आउट, साबणे ले आउट, रावण टेकडी परिसर व शहरातील   नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. याबाबत परिसरातील नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. डम्पींग ग्राऊंडवरील आग विझविण्यासाठी नगर पालीका प्रषासनाकडून अग्निशमन विभागाच्या गाडयांचे अनेक बंब रिचविण्यात आले. त्यानंतर शुक्रवार दि.२६ फेब्रुवारी रोजी पुन्हा  या डम्पींग ग्राऊंडवरील कचºयाला आग लागली. त्यामुळे नगर परिषद आरोग्य विभागाच्या गलथान कारभारावर पश्नचिन्ह उपस्थित केले जात असून आगीमुळे निर्माण होणाऱ्या धुराचा पुन्हा नागरिकांना त्रास सहन करावा लागला. परिसरातील नागरिकांच्या विनंतीवरुन दि.२७ फेब्रुवारी रोजी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी प्रत्यक्ष डम्पींग ग्राऊंडवर जावुन पाहणी केली व परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांकडून डम्पींग ग्राऊंडवरील कचऱ्यामुळे होत असलेल्या त्रासाची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्या समवेत नगरसेवक किशोरआप्पा भोसले, एनएसयुआयचे शहर अध्यक्ष रोहित राजपूत, पत्रकार पंकज ताठे, गिरीश देशमुख,राजु देशमुख,देवीदास चव्हाण, योगेश नागवाणी आदी उपस्थित होते. नगर पालीका प्रशासनाने हा विषय गांभीयार्ने घेउन त्यावर तोडगा काढायला हवा. आगीच्या घटनाबाबत परिसरातील नागरिकांनी शिवाजी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. वारंवार आग लागण्याची घटना घडत राहिल्यास परिसरातील नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी या गंभीर बाबीकडे जातीने लक्ष देउन खामगांव नगर पालीका प्रशासनाला उपाययोजना करण्यासाठी सुचना देण्यात याव्या व डम्पींग ग्राऊंडवरील कचरा जाळल्य प्रकरणाची सखोल चैकशी करुन सर्व संबंधीतांवर जबाबदारी निश्चीत करुन त्यांच्याविरुध्द राष्ट्रीय हरित लवादा प्राधीकरणाच्या आदेशाचा भंग करुन उघडयावर कचरा जाळल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी पर्यावरण मंत्री ना.आदित्य ठाकरे यांच्यासह वरिष्ठांकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here