Home बुलढाणा जिल्हा कोरोना अपडेट सध्या रूग्णालयात 2699 कोरोना बाधीत रूग्ण:193 मृत्यू ; हे गावच सील

सध्या रूग्णालयात 2699 कोरोना बाधीत रूग्ण:193 मृत्यू ; हे गावच सील

बुलडाणा दि.28 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3600 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3260 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 340 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 275 व रॅपीड टेस्टमधील 65 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1600 तर रॅपिड टेस्टमधील 1660 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3260 अहवाल निगेटीव्ह आहेत. अगोदर 18 आणि 21 असे 43 रुग्ण आढळून आल्याने खामगाव तालुक्यातील हिवरखेड गाव सील करण्यात आले आहे.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मलकापूर शहर : 9, मलकापूर तालुका : माकनेर 1, दाताळा 1, चिखली शहर : 11, चिखली तालुका : शेलूद 1, पळसखेड दोलत 2, दे. राजा शहर : 18, दे. राजा तालुका : अंढेरा 4, वाकी 2, सावंगी टेकाळे 4, सातेफळ 1, दे. मही 1,सिनगाव जहागीर 4, आळंद 4, बुलडाणा शहर : 41, बुलडाणा तालुका : सागवन 2, सुंदरखेड 1, शिरपूर 1, अंभोडा 6, माळविहिर 1, धाड 1, मोताळा शहर : 1, मोताळा तालुका : गुळभेली 1, जळगांव जामोद शहर : 7, जळगांव जामोद तालुका : झाडेगाव 7, धानोरा 1, आसलगाव 2, कुरणगड 12, खामगांव शहर : 25, खामगांव तालुका : घाटपुरी 4, निरोड 4, उमरा अटाळी 2, विहिगाव 2, रोहणा 1, पिं. राजा 1, हिवरखेड 21, शिरला नेमाने 1, शेगांव शहर : 30, शेगांव तालुका : भोन गाव 1, अळसना 1, जनोरी 9, टाकळी विरो 3, तरोडा कसबा 1, सिं. राजा शहर : 3, सिं. राजा तालुका : साखर खर्डा 1, कि. राजा 1, लोणार तालुका : हिरडव 2, सुलतानपूर 2, मेहकर तालुका : जानेफळ 11, दुधा 1, मोळा 1, निंबा 1, कल्याणा 1, हिवरा साबळे 4, गजरखेड 6, डोन गाव 1, पेन सावंगी 2, दे. माळी 5, घाटबोरी 1, कळमेश्वर 1, मेहकर शहर :14, नांदुरा शहर :20, नांदुरा तालुका : वाडी 2, तरवाडी 1, तांदुळवाडी 2, मूळ पत्ता जाळीचा देव ता. भोकरदन 1, वाशिम येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 340 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान राम नगर, बुलडाणा येथील 60 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 284 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : स्त्री रूग्णालय 4, अपंग विद्यालय 29, कोविड रुग्णालय 9, दे. राजा : 50, चिखली : 71, नांदुरा : 10, जळगांव जामोद : 5, सिं. राजा : 8, मलकापूर : 2, लोणार : 27, संग्रामपूर :2, खामगांव : 2, शेगांव : 22, मोताळा:6, मेहकर : 29.
तसेच आजपर्यंत 136832 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 15776 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 15776 आहे.
आज रोजी 8589 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 136832 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 18668 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 15776 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 2699 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 193 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here