Home बुलढाणा जिल्हा कोरोना अपडेट असा आहे आज कोरोना बाधीत रुग्णाचा आकडा

असा आहे आज कोरोना बाधीत रुग्णाचा आकडा

 

खामगाव- ग्रामीण आणि शहरी भागातील तपासण्या वाढविण्यात आल्या असून शनिवारी रात्री 12 वाजताच्या आकडेवारी नुसार बुलडाणा जिल्ह्यातील कोरोनाने बाधीत रुग्ण संख्या 340 आहे.

कोरोनाने जिल्ह्यात कहर सुरू केला असून पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी लागून केली असून शनिवारी व रविवारी कडकडीत बंद ठेवला जाणार आहे. दरम्यान आरोग्य विभागाने तपासण्या वाढविल्या असून शहरी आणि ग्रामीण भागात सुद्धा नागरिकांचे नमूने घेवून प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठवले जात आहे.

जोवर कोरोनावर इलाज सापडत नाही तोपर्यंत नागरिकांना खबरदारीने वागण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे, कोरोनाची लस सुद्धा उपलब्ध झाली असून काही दिवसांनी खाजगी आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये लस येईल असे सांगितले जात आहे. तोवर नागरिकांना संयम ठेवावा लागेल. त्यासाठी जे नियम आहेत ते पाळावे लागणार आहेत. त्यात प्रामुख्याने मास्कचा वापर, गर्दी टाळणे, नियमितपणे हात धुणे असे साधे सोपे उपाय आहेत. कोरोनाने घाबरून जायचे नाही मात्र जबाबदारीने वागणे मात्र अत्यावश्यक आहे.

दरम्यान आजच्या तारखेत बुलढाणा जिल्ह्यात 340  रूग्ण नोंदविले गेले असून तालुकानिहाय आकडेवारी सोबत जोडली आहे.

—————-
28/2/2021

आज बुलढाणा जिल्ह्यात तब्बल
340_अहवाल_कोरोना_पॉझिटिव्ह

▪️बुलडाणा: 54 ▪️खामगाव: 62
▪️शेगाव : 46 ▪️दे. राजा : 37
▪️चिखली : 14 ▪️मेहकर : 48
▪️मलकापूर: 12▪️नांदुरा : 24
▪️लोणार : o3▪️मोताळा : 00
▪️सि. राजा : 05 ▪️जळगाव जा.: 30
▪️संग्रामपूर : 00▪️लाखनवाडा 0o
▪️सिद्धिविनायक सेंटर : 05

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here