Home Breaking News काँग्रेसचा एक हाती सत्ता मिळवण्याचा प्रयत्न राहील : संजय राठोड

काँग्रेसचा एक हाती सत्ता मिळवण्याचा प्रयत्न राहील : संजय राठोड

 

बुलडाणा – काँग्रेस कार्यकर्त्यां मध्ये उत्साह आहेतच तो अजुन दुपटीने वाढवून राज्यात एक हाती सत्ता मिळवण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेश कमिटीचे नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड यांनी आज बुलडाणा येथे दिली आहे.
काल 26 फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव के.सी.वेणुगोपाल यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्षांची घोषणा केली आहे. त्यामध्ये बुलडाणा येथील काँग्रेसचे नेते संजय राठोड यांचाही समावेश आहे. आज मुंबई येथून बुलडाणा परतल्यानंतर कार्यकर्त्यांनी संजय राठोड यांचा जंगी स्वागत केलं. प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देतांना संजय राठोड म्हणाले की काँग्रेसचा पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येक गावात जाण्याची आवश्यकता आहे, तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा काम करावा लागणार, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहेतच तो दुपटीने वाढवून महाराष्ट्र मध्ये एक हाती सत्ता मिळवण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न राहणार आहे तसेच जिल्ह्यातील व राज्यातील जे नेते काँग्रेस सोडून गेलेले आहे ते संपर्कात आहे त्यांना परत काँग्रेसमध्ये घेणार असल्याची माहिती यावेळी संजय राठोड यांनी दिली.

पहा व्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here