Home Breaking News पूजा चव्हाणला न्याय देण्यासाठी आमदार श्वेताताई महाले उतरल्या रस्त्यावर!

पूजा चव्हाणला न्याय देण्यासाठी आमदार श्वेताताई महाले उतरल्या रस्त्यावर!

 

चिखली: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मृतक पुजाला न्याय मिळावा यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने वाशी टोल नाका नवी मुंबई या ठिकाणी आज चक्का जाम आंदोनल केले .भारतीय जनता पक्षाच्या इतर महिला पदाधिकारी यांना वाशी पोलिसांनी स्थानबद्ध केले व नंतर सुटका करण्यात आली आहे .
पूजा चव्हाण या युवतीने आत्महत्या केली . या आत्महत्या प्रकरणात एका मंत्र्यांच्या आवाजातील अनेक व्हाईस कॉल संभाषण व्हायरल झाल्याने संशय वाढत आहे . परंतु सरकार कडून कोणतीही कारवाई होत नसल्याने मृतक पुजा न्यायचा आक्रोश करीत आहे . यामुळे पूजा चव्हाण हिला न्याय मिळालाच पाहिजे.
पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणी एका मंत्र्याकडे संशयाची सुई वळते आहे. या मंत्र्याची हकालपट्टी करून त्याच्यावर कारवाईच्या मागणीसाठी भाजपा महिला मोर्चा राज्यभरात ‘चक्का जाम आंदोलन’ करण्यात आले . यावेळी चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले नवी मुंबई जिल्हाध्यक्ष इ रामचंद्र बा. घरत, महिला मोर्चा अध्यक्षा सौ दुर्गाताई ढोख, माजी अध्यक्षा सौ वर्षाताई भोसले,प्रदेश सदस्य सौ कल्पनाताई शिंदे, महामंत्री सौ कल्पनाताई छत्रे, माजी नगरसेविका सौ विजयाताई घरत, श्रीमती उज्वला जगताप जिल्हा महामंत्री,जिल्हा उपाध्यक्ष राजाराम पाटील, मंडळ अध्यक्ष सुरेश अहिवले, वार्ड अध्यक्ष नारायण पाटील, युवा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, युवा उपाध्यक्ष अविनाश भगत आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here