Home बुलढाणा जिल्हा कोरोना अपडेट जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 2644 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार; असे आहेत गावनिहाय...

जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 2644 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार; असे आहेत गावनिहाय रुग्ण

कोरोना अलर्ट : प्राप्त 2927 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 349 पॉझिटिव्ह
234 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा, दि.27 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3276 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2927 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 349 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 276 व रॅपीड टेस्टमधील 73 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1218 तर रॅपिड टेस्टमधील 1709 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2927 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मलकापूर शहर : 32, मलकापूर तालुका :नरवेल 4,कुंड 5, दुधलगांव 1, जांभुळधाबा 2, वरखेड 1, उमाळी 1, माकनेर 1, पिंपळखुटा 1, लोणवडी 1, चिखली शहर : 12, चिखली तालुका : अंत्री कोळी 1, मेरा बु 1, बोरगाव वसू 1, जांभोरा 2, केळवद 3, सवणा 9, शेलूद 1, हातणी 2, सावरखेड नजीक 1, अंचरवाडी 2, चांधई 2, सावंगी भगत 1, आमखेड 1, कोळेगांव 1, अमडापूर 2, भडगांव 2, दे. राजा शहर : 12, दे. राजा तालुका : अंढेरा 2, टाकरखेड भागीले 2, वडगांव 1, दे. मही 1, उंबरखेड 2, सिनगाव जहागीर 3, शिवणी आरमाळ 1, बुलडाणा शहर : 49, बुलडाणा तालुका : हतेडी 2, धामणगांव 1, गोंधनखेड 2, दत्तपूर 1, दहीद बु 1, मढ 1, सागवन 1, डोंगरखंडाळा 2, कोलवड 1, सुंदरखेड 4, शेलसूर 1, मोताळा शहर : 10, मोताळा तालुका : पिंप्री गवळी 2, धा.बढे 2, सारोळा मारोती 1, जळगांव जामोद शहर : 5, जळगांव जामोद तालुका : भेंडवळ 1, खामगांव शहर : 20, खामगांव तालुका : घाटपुरी 1, भालेगांव 5, पिंपळगांव देशमुख 2, कुंबेफळ 2, बोरजवळा 1, दधम 1, निरोड 1, कंचनपूर 1, कंझारा 1, शेगांव शहर : 46, शेगांव तालुका : माटरगाव 1, खेर्डा 1, चिंचखेड 4, चिंचोली 2, खौलखेड 7, जळंब 1, लोणार शहर : 5, सिं. राजा शहर : 14, सिं. राजा तालुका : पिंपळखुटा 3, शेंदुर्जन 5, रूम्हणा 1, कि. राजा 1, लोणार तालुका : हिरडव 2, कुरमपूर 3, गुंधा 3, मेहकर तालुका : जानेफळ 1, गजरखेड 1, संग्रामपूर शहर : 9, नांदुरा तालुका : शेंबा 1, मूळ पत्ता अकोला 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 349 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 234 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : स्त्री रूग्णालय 4, अपंग विद्यालय 56, दे. राजा : 13, चिखली : 43, नांदुरा : 9, जळगांव जामोद : 6, सिं. राजा : 8, मलकापूर : 31, लोणार : 2, खामगांव : 36, शेगांव : 26
तसेच आजपर्यंत 133572 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 15492 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 15492 आहे.
आज रोजी 8742 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 133572 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 18328 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 15492 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 2644 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 192 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here