Home कोरोना अपडेट्स लॉकडाऊन मध्ये सर्व सामान्य जनता उपाशी मरेल… 

लॉकडाऊन मध्ये सर्व सामान्य जनता उपाशी मरेल… 

 

खामगाव  : पुन्हा एकदा कोरोना सारख्या कथित आजाराने डोके वर काढले आहे. कारण ज्या राज्यात निवडणुका आहेत त्या राज्यात कोरोना प्रवेश करत नाही आणि ज्या राज्यात अधिवेशन आहे, गॅस – पेट्रोल – डिझेल मुळे उद्रेक वाढण्याची शक्यता आहे त्या राज्यात मात्र कोरोनाला प्रवेशद्वार खुले आहे असे दिसते. त्यात सरकार फक्त घोषणा करत आहे ऑनलाइन गप्पा करत आहे कोरोना च्या आजारावर मात करण्यासाठी पुन्हा लॉक डाऊनच हत्यार जोपासण्यात आलं, पण यामध्ये सर्व सामान्य जनतेचे काय ? हा विचार सरकार ने केला का ?सरकारला जनतेची एवढी काळजी असेल तर आजारावर मात करण्यासाठी खुशीनाम लॉक डाऊन करा पण त्याआधी सर्व सामान्य जनतेच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटवा, असा खडा सवाल सत्याग्रह शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलास फाटे यांनी उपस्थित केला आहे अगोदरच पहिल्या लॉक डाऊन ने आर्थिक संकट आलं होतं त्याचे सावट सुद्धा अद्याप झाले नाही. इतक्यात सर्व सामान्य जनतेच गाडं रस्त्यावर येत असतांना पुन्हा लॉक डाऊन लावले तर उद्रेक होईल हे सरकारने लक्षात ठेवायला हवं. लॉक डाऊन जर करायचा तर त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लावा आणि खुशीनाम लॉक डाऊन करा. अस जर झालं नाही तर भूकमारी ने अनेकांचे जीव जातील आणि भीतीमुळे जीव जातील त्याला सरकार जबाबदार असेल. त्यामुळे या कडे सरकारने गंभीर होणे गरजेचे आहे असं ही मत कैलास फाटे यांनी व्यक्त केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here