Home हॅलो बुलडाणा शेलगांव बाजार ग्रा.पं.चा जिल्ह्यातील असाही पहिला प्रयोग         

शेलगांव बाजार ग्रा.पं.चा जिल्ह्यातील असाही पहिला प्रयोग         

मलकापुर :- गावातुन विविध करापोटी मिळणारा महसुल नियोजनबध्द पद्धतिने ग्राम विकासांसाठी वापरुन ग्रामस्थांचे जिवनमान ऊंचावण्याचा एक अनोखा पॅटर्न लोकनियुक्त सरपंच सरलाताई अमित खर्चे यांनी आपले स्वकल्पनेतुन जिल्हा स्मार्ट ग्राम ग्रामसंसद कार्यालय शेलगांव बाजार ता.मोताळा जि.बुलढाणा ग्रामपंचायतीचे माध्यमातुन अमलात आणला आहे.
       सदैव नवनविन ऊपक्रमशील म्हणुन जिल्हाभरात ओळख असणा-या शेलगांव बाजार ग्रामपंचायतीने आता ठरवुन दिलेल्या वेळेत कर भरणा-या मालमत्ता धारकांस घरगुती वापरासाठी धान्याची मोफत डाळ करून देण्याचा अभिनव ऊपक्रम राबविला आहे.
 ग्रामपंचायतीच्या वतिने ज्या मालमत्ताधारकाने चालु सन २०/२१ या आर्थिक वर्षाचा ग्रामपंचायतीच्या सर्व कराचा भरणा केलेला असेल किंवा ज्यांचा कर भरणा राहिलेला असेल त्यांनी 15 मार्च पर्यंत आपला कर भरणा करावा व या कर भरणा केलेल्या सर्वांना ३१ मार्च २०२१ पर्यंत आता येणाऱ्या  दि.२७ फेब्रु शनिवार पासुन प्रति कुटुंब १०० किलो( एक क्विंटल)डाळ मोफत तयार करुन मिळेल. डाळी ह्या तुर,हरभरा,मुंग,ऊळीद ह्यापैकी (एकत्रित १०० किलो मिळुन) ज्या पाहिजे त्या करुन मिळतील. ह्या डाळी करुन देण्यासाठी  ग्रामपंचायतीने स्वनिधीतुन स्वत:ची गिरणी सुरु केली आहे.गिरणी चालु करतांना सद्यःस्थितीत प्रत्येक आठवड्यातिल दोन दिवस ( शनिवार व रविवार)चालु राहिल.तरी ग्रामस्थांनी डाळ तयार करण्यासाठी प्रत्येक आठवड्यातिल शनिवार व रविवार या दोन दिवशी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत यावे.येतांना चालु वर्षाचा कर भरणा केल्याचे ग्रामपंचायतिची पावती सोबत आणावी.ज्यांना काही शंका वा संबंधित योजनेबद्दल काही विचारायचे असेल त्यांनी ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा.
     सदर योजनेचा लाभ गावातील सर्व कुटुंब धारकांनी  घ्यावा व आपले हक्काचे ग्रामपंचायतीस आपले अमुल्य असे सहकार्य करावे असे आवाहन उद्घाटन प्रसंगी लोकनियुक्त सरपंचा सरलाताई खर्चे यांनी केले आहे उद्घाटनप्रसंगी ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here