Home आंदोलन पोलिसांच्या सतर्कतेने आंदोलनकर्त्याचे वाचले प्राण

पोलिसांच्या सतर्कतेने आंदोलनकर्त्याचे वाचले प्राण

शेगावात विजय यादव यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

शेगाव : (प्रतिनिधी) शेगाव नगर पालिकेच्या हद्दीतील ओपन स्पेस ची जागा नगरपालिकेने आपल्या संस्थेला सामाजिक उपयोगासाठी द्यावी या मागणीसाठी शेगावात एका माजी नागरसेवकांकडून आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता यामध्ये आज आत्मदहनाचा थरारनाट्य शेगावात पहावयास मिळाले. आंदोलनकर्त्यांने वेशांतर करून नगर नगरपालिका परीसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या वेळी अंगावर पेट्रोल घेतल्यानंतर पोलिसांनी जीवाची परवा न करता त्याला वाचवले, गांधी चौकात घडलेल्या या थरार नाट्याची शहरात जोरात चर्चा सुरू आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नगर परिषद हद्दीतील शेत सर्व्हे क. 729 मधील ओपन स्पेस ची जागा वृक्षारोपण उपयोगी,बगिचा,शारिरीक शिक्षण सांस्कृतिक व सामाजिक विकासाचा प्रयोजनासाठी युवा कांती बहुउद्देशीय संस्थेला देण्यात यावी अन्यथा न.प. च्या सर्वसाधारण सभेच्या दिवशी न.प.च्या प्रांगणात आत्मदहन करेल असा इशारा संस्थेचे अध्यक्ष विजय यादव यांनी दिला होता. यामध्ये आज शेगाव नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती यामुळे यादव हे आत्मदहनाचा प्रयत्न करतील म्हणून पोलीस प्रशासनाने नगरपालिका परिसरामध्ये चोख बंदोबस्त लावला होता. दरम्यान सकाळी साडे अकराच्या सुमारास आंदोलनकर्ते विजय यादव यांनी वेषांतर करून नगरपालिका परिसर गाठण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका मालवाहू ऑटो मधून पेट्रोल ची बॉटल घेऊन गांधी चौकात पोहोचतात पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर वर झडप घातली दरम्यान यादव यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेतले होते. पोलिसांनी कसेबसे आंदोलनकर्त्याला धरून ठेऊन माचीस आणि पेट्रोल बॉटल ताब्यात घेतली. तर यादव यांच्या अंगावर आणि तोंडावर पेट्रोल पडल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मागणी मान्य होई पर्यँत लढा सुरूच राहणार – विजय यादव

समाजासाठी काही करण्याची प्रबळ इच्छा आहे. मागणी केलेल्या जागेत स्वखर्चाने मंगल कार्यालय, अभ्यासिका आणि व्यायामशाळा बनविण्यासाठी आपण जागेची मागणी केली आहे मात्र या मागणी कडे दुर्लक्ष केल्याने आज आपण आत्मदहन करीत असतांना वेळेवर पोलिसांनी मला ताब्यात घेतले. मात्र यामुळे आपल्या आंदोलनावर फरक पडलेला नाही. मागणी मान्य होई पर्यँत लढा सुरूच ठेवणार असल्याचे युवा कांती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विजय यादव यांनी  सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here