Home महाराष्ट्र पोलीस पोलिसांनी सैराट कहाणीमधील युवतीचा लावला शोध…

पोलिसांनी सैराट कहाणीमधील युवतीचा लावला शोध…

अमरावती – अकोला – बुलढाणा जिल्ह्यातील पोलिसांनी सैराट कहाणीमधील युवतीचा लावला शोध…

युवतीने प्रेमविवाह केल्याचे उघडकीस आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला…

शेगांव(प्रतिनिधी) : युवतीचे अपहरण झाल्याची सूचना मिळाल्यामुळे पोलीस यंत्रणा कामाला लागली, परंतु या अपहरण नाट्याचा शेवट प्रेमविवाहात झाल्याची माहिती पुढे आल्यानंतर समाजमाध्यमव पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. या दरम्यान पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. प्रेमविवाह केलेल्या युवतीने अपहरण झाल्याचे संदेश मोबाइलद्वारे घरच्यांना पाठविल्यामुळे अकोट, शेगाव पोलिसांसह कुटुंब चिंतेत झाले होते.अमरावती जिल्ह्यातील एका गावातील २२ वर्षीय युवती ही शेगाव येथे बहिणीकडे गेली होती. शेगावहून अकोटमार्गे परत जात असताना,अकोट शहरात तिचे अपहरण झाल्याची भन्नाट स्टोरी तयार करून, प्रेमविवाह पार पडेपर्यंत अपहरण कसे झाले, अपहरण करणारे कोण आदीबाबत मोबाइलद्वारे संदेश पाठवून युवतीने कुंटुब व पोलिसांचे लक्ष विचलित केले. अपहरण झाल्याची माहिती मिळाल्यावरून शेगाव पोलिसांत युवती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली. शेगावपासून एक
महिला आपल्यावर लक्ष ठेवून होती, तिने यंत्रणेची दमछाक अकोटमधून आपले अपहरण केले,असे संदेश युवतीने पाठविल्याने अकोट शहर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत, युवतीचा शोध घेण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले. मोबाइल लोकेशन, संदेशाची तपासणी, सायबर क्राइमकडून सीडीआर आदी माहिती गोळा करण्यासाठी शहर पोलिसांची दमछाक सुरू होती. मोबाइल लोकेशनवरून पोलीस युवतीच्या मागावर होते. सोशल मीडियावर युवतीचे फोटो व्हायरल झाले. तिला शोधण्यासाठी आवाहन करण्यात आले. समाजमाध्यमेही कामाला लागली.. तेवढ्यात पथ्रोट येथील आर्यसमाज मंदिरात त्या युवतीने अकोट तालुक्यातील एका गावातील २६ वर्षीय युवकासोबत प्रेमविवाह केल्याची माहिती समोर आली. अकोला-अमरावती-बुलडाणा पोलीस या सैराट कहाणीमधील युवतीला गंभीरतेने शोधण्यासाठी जिवाचे रान करीत होते,परंतु त्या युवतीने प्रेमविवाह केल्याचे उघडकीस आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here