कोरोना अलर्ट : प्राप्त 2434 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 308 पॉझिटिव्ह
134 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.25: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2753 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2434 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 308 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 242 व रॅपीड टेस्टमधील 66 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1188 तर रॅपिड टेस्टमधील 1246 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2434 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मलकापूर शहर : 46, मलकापूर तालुका : तांदुळवाडी 2, तालसवाडा 1, चिखली शहर : 34, चिखली तालुका : चांधई 1, पळसखेड 1, अंचरवाडी 1, शेलगांव आटोळ 1, पळसखेड दौलत 1,अमोना 1, भोकर 2, डोंगर शेवली 2, मुरादूपर 1, शिंदी हराळी 3, सावरगांव डुकरे 2, तेल्हारा 1,मंगरूळ नवघरे 1, आमखेड 1, खैरव 1, शेलूद 2, शिरपूर 2, वळती 1, माळशेंबा 1, कोलारा 3, टाकरखेड हेलगा 1, दहीगांव 1, मेहकर शहर : 3, मेहकर तालुका : डोणगांव 1, सावत्रा 3, हिवरा आश्रम 1, शेंदला 1, जानेफळ 1, बुलडाणा शहर : 37, बुलडाणा तालुका : माळविहीर 1, हतेडी 1, डोंगरखंडाळा 1, सागवन 6, अजिसपूर 1, नांदुरा शहर : 1, खामगांव शहर : 41, खामगांव तालुका : शेलोडी 1, घाटपुरी 3, शेगांव शहर : 1, जळगांव जामोद शहर : 2, जळगांव जामोद तालुका : झाडेगांव 1, आसलगांव 11, पिं. काळे 1, सुलज 1, दे. राजा तालुका : वाघोरी वडगांव 1,वाकी 2, डोढ्रा 2, दे. मही 4, सावंगी टेकाळे 2, सिनगांव जहागीर 6, आळंद 3, चिंचोली बुरुकुल 2, दे. राजा शहर : 14, सिं. राजा शहर : 8, सि. राजा तालुका : सवडत 1, पिंपळखुटा 2, वाघोरा 3, राहेरी 1, सावरगांव माळ 1, शेंदुर्जन 1, लोणार तालुका : वेणी 3, मोताळा तालुका : बोराखेडी 3, पिं. देवी 1, तळणी 1, सारोळा मारोती 1, खरबडी 1, उऱ्हा 1, वरूड 3, मूळ पत्ता नागपूर 1, पिंपरखेड ता. तेल्हारा जि. अकोला 1, भंडारा 1, अकोला 1, सांजोळ ता. जाफ्राबाद जि. जालना 1, बीड 2 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 308 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान गोपाल आश्रम, बुलडाणा येथील 75 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 134 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : अपंग विद्यालय 39, दे. राजा : 12, चिखली : 40, मलकापूर : 14, शेगांव : 19, लोणार : 4, सिं. राजा : 1, जळगांव जामोद : 4, मोताळा : 1.
तसेच आजपर्यंत 127372 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 15079 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 15079 आहे.
आज रोजी 7131 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 127372 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 17588 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 15079 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 2317 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 192 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
***********
जिल्ह्यातील अन्य बातम्याही वाचा….
किमान वेतन अधिनियम च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनजागृती सप्ताह
22 ते 28 फेब्रुवारी दरम्यान आयोजन
बुलडाणा,(जिमाका) दि.25 : किमान वेतन अधिनियम 1948 ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामार्फत 22 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. तसेच किमान वेतन अधिनियम 1948 अंतर्गत विविध आस्थापना, दुकाने, हॉटेल्स, कारखाने, विविध उद्योग व इतर व्यापारी संस्थांतर्गत एकूण 67 अनुचित उद्योगातील कामगारांसाठी किमान वेतन दर निश्चित केलेले आहेत. कलम 12 (1) नुसार कामगारास किमान वेतन देणे बंधनकारक आहे. या संदर्भात जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती सरकारी कामगार अधिकारी आ. शि. राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
***********
मार्च महिन्याचा लोकशाही दिन रद्द
बुलडाणा,(जिमाका) दि.25 : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन मार्च महिन्यात होणार नाही. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी सदर लोकशाही दिन दु 1 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येतो. जिल्ह्यात कोविड 19 चा प्रादुर्भाव जास्त वाढत असल्याने माहे मार्च 2021 रोजी सोमवार 1 मार्च 2021 रोजी आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन रद्द करण्यात येत आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
*******