Home जागर दिव्यांग तलाठी डीवरे यांचे प्रेरणादायी कार्य: शाळेला ‘ही’ मोलाची भेट

दिव्यांग तलाठी डीवरे यांचे प्रेरणादायी कार्य: शाळेला ‘ही’ मोलाची भेट

खामगाव : खामगाव तालुक्यातील ग्राम पंचायत पिंप्री गवळी येथील म.पु.मा.शाळेला सात बारा च्या तलाठी हिस्सातील नक्कल फी च्या जमा झालेल्या रकमेतुन नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले तसेच दिव्यांग असलेले आदर्श तलाठी अर्जुन डिवरे माऊली यांनी ताशी पन्नास लिटर जल शुध्दीकरण यंञ (RO) मशीन त्यांनी प्रदान केली आहे.
या कार्यक्रमाला सरपंच सिमाबाई ईंगळे ,उपसरपंच मुक्ताबाई फुंडकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामसेवक म्हस्के साहेब, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पोलीस पाटील , मुख्याध्यापक तुंबळे गुरुजी सर्व शिक्षक महसूल विभागाचे मंडळ अधिकारी मा. भरगडे साहेब आदी उपस्थित होते, या जलशुध्दी यंञाने शाळेत शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण विद्यार्थीवर्गाला त्याचा चांगलाच फायदा होईल असे ऊपस्थित असलेल्या मान्यवरांनकडुन यावेळी मार्गदर्शनपर सांगितले. कोरोना काळातही श्री डिवरे तलाठी यांनी शहरी वा ग्रामीण भागातील अत्यंत हलाखीत असलेल्या दिव्यांग परिवारालाही त्यांनी प्रत्यक्ष जाऊन त्यांनी मदत ऊपलब्द करुन दिली होती. जलशुध्दी यंञाचा(RO) हा छोटीखानी कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळुन अत्यंत मोजक्या मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here