खामगाव : कोरोना रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणांवर ताण येत आहे, सध्या खामगाव शहरातील सरकारी कोविड हॉस्पिटल व घाटपुरी येथील कोविड सेंटर हाऊसफुल आहे.
खामगाव शहर आणि तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्ण वाढले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांना घाटपुरी येथील कोविड सेंटर तर हायरिस्क असलेल्या रुग्णांना कोविड हॉस्पिटलमध्ये भरती केल्या जाते. दोन्ही ठिकाणी 50 असे 100 बेड आहेत. हे सर्व बेड भरलेले असून नवीन रुग्ण आढळून आले तर त्यांना दाखल करता यावे याकरिता मुलीचे वसतिगृह येथे 150 बेडचे कोविड सेंटर सुरु केले जाणार आहे. दरम्यान डॉक्टर, नर्स व आरोग्य कर्मचारी कमी असल्याने याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
खामगाव शहरात आजपासून टेस्ट
आजपासून खामगाव नगर पालिका व शहरात टेस्ट सुरू केल्या जाणार आहेत, तशा सूचना नगर पालिका प्रशासनाने दिल्या असून दुकानदार, व्यापारी, भाजीपाला व घाऊक विक्रेते यांच्या टेस्ट प्रथम केल्या जाणार आहेत. तसेच शहरात सुद्धा नागरिकांच्या टेस्ट केल्या जाणार आहे. उल्लेखनीय आहे की, यासंदर्भात ‘रिपब्लिक महाराष्ट्र’ ने नगर पालिकेचे लक्ष वेधले होते.