खामगाव : कोव्हीड-19 च्या प्रतीबंधात्मक आदेशाचे काटेकोरपणे पालन व्हावे व कोरोना विशाणूचा प्रार्दुभाव होवु नये यासाठी नगर पालीकांना सुचना देण्यात आल्या आहेत. तरी खामगांव नगर पालीकेची विषेश सभा 26 फेब्रुवारी शुक्रवार रोजी सकाळी 11.30 वाजता सुचीवरील विषय तातडीचे नसतांना संबंधीत ठराव पारीत करण्याबाबत बोलावलेली आहे असून ती रद्द करावी अशी मागणी काँग्रेस नगरसेविका सरस्वतीताई खासने यांनी केली आहे
नगर परिषदेमध्ये अध्यक्षसहित एकुण संख्या 37 आहे व न.प.चे मुख्याधिकारी तसेच सर्व विभागाचे खाते प्रमुख, पत्रकार,चपराशी अंदाजे 60 पेक्षा जास्त नेहमी सभेमध्ये उपस्थिती असते. सभागृहाची क्षमतादेखील छोटी असल्यामुळे जवळजवळ सभेमध्ये सर्व पदाधिकारी, कर्मचारी बसलेले असतात. यामुळे कोरोना विशाणूचा संसर्ग होउन त्याचा प्रार्दुभाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही व सभेच्या माध्यमातून कोरोना विषानूमुळे नगरसेवकांना धोका निर्माण होऊ शकतो. नगरसेवक व कर्मचारी कोरोना संसर्गाचा धोका होउ शकतो व त्यामुळे त्यांच्या परिवाराला सुध्दा कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होवू शकतो म्हणून ही सभा रद्द करावी अशी मागणी सुद्धा श्रीमती सरस्वतीताई भास्कर खासने यांच्या सह काँगेस नगरसेवकांनी केली आहे.