बुलडाणा : बुधवारी रात्री 12 वाजेप्रर्यंत संकलित माहिती नुसार आज अखेरीस जिल्ह्यात 2753 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 308 रुग्ण पॉझिटिव्ह (positive) आले आहेत. तसेच एक मृत्यू. त्यामूळे Positivity rate 11.18 % एवढा आहे…
विशेष करून खामगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील वाढती रुग्ण संख्या चिंतेचा विषय आहे. खामगाव तालुक्यातील हिवरखेड 16 अंत्रज गावात 5 मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले.
कोरोनाने रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच तालुके प्रतिबंधीत क्षेत्र घोषित केलेले असून कडक निर्बंध लावण्यात आलेले आहे. जिल्ह्यात बुधवार अखेर एकूण 17280 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 14945 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. कोरोना बाधीत आणखी 308 रुग्ण आज वाढले आहेत तसेच बुलडाणा जिल्ह्यात आजपर्यंत 192 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
चिखली व बुलडाण्यात आलेख वाढताच
▪️बुलडाणा: 55 ▪️खामगाव: 49
▪️शेगाव : 01 ▪️दे. राजा : 39
▪️चिखली : 60 ▪️मेहकर : 10
▪️मलकापूर: 46▪️नांदुरा : 01
▪️लोणार : 03▪️मोताळा : 09
▪️सि. राजा : 15▪️जळगाव जा.: 13
▪️संग्रामपूर : 00
▪️सिद्धिविनायक सेंटर : 07