खामगाव :स्थानिक नगर पालिका प्रशासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिरंगाई केली असल्याने रुग्ण वाढण्याचा धोका आहे. अजून शहरात कोरोना टेस्ट सुरू करण्यात आलेल्या नाहीत, बुधवारी यासंदर्भात बैठक झाली असून टेस्ट सुरू करण्याचा मुहूर्त कोणता? हे आज कळेल.
खामगाव शहरातील परिस्थिती सध्या नियंत्रित असली तरी नगर पालिका प्रशासन हाताची2 घडी करून बसले तर रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जे लोक जास्त संपर्कात येतात त्यांना बाधा असण्याची भीती आहे, त्यात किराणा व इतर व्यापारी, भाजीपाला, फळ व विविध मालाचे विक्री करणारे लोक यांचा समावेश आहे. तलाव रोड सो सिंधी कँम्प, बालाजी प्लॉट, सराफा, घाटपुरी नाका भाजी मंडी या भागात पहिल्यांदा टेस्ट सुरू केल्या जाणार आहेत.
तालुक्यातील हे गाव कंटेटमेंट झोन
खामगाव तालुक्यातील हिवरखेड हे गाव सील कंटेटमेंट झोन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात मोठया प्रमाणात टेस्ट सुरू आहेत. बुधवारी अंत्रज येथे 5 तर हिवरखेड येथे 16 कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.
कोविड सेंटर हाउसफुल, सुविधा नाहीत
कोरोना बाधीत रुग्णासाठी पिंपळगाव राजा रोडवर कोविड सेंटर असून तेथील 50 बेड पूर्ण भरलेले आहेत. मात्र येथे सुविधा नसल्याने रुग्ण त्रस्त आहेत. 3 वैद्यकीय अधिकारी व 2 नर्स हे या सेंटरचा गाढा ओढत आहेत. सफाई करिता स्वीपर नाही, ते पुरविणे ही नगर पालिकेची जबाबदारी आहे, तर जेवण व नास्ता सुमार दर्जाचा आहे. जेवणाचे कंत्राट मुंबई येथील कंत्राटदार यांना देण्यात आले असून त्यावर तहसीलदार यांनी निरीक्षण ठेवणे गरजेचे आहे,