Home Breaking News दुचाकी, चारचाकी गाडी घ्यायची, मग आहे ना जप्त वाहनांचा लिलाव!

दुचाकी, चारचाकी गाडी घ्यायची, मग आहे ना जप्त वाहनांचा लिलाव!

 

बुलडाणा, दि.24 : वनविभागा अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी, घाटबोरी या परिक्षेत्रामध्ये वनगुन्हा अंतर्गत जप्त व सरकार जमा करण्यात आलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांची विल्हेवाट करावयाची आहे. घाटबोरी परिक्षेत्रामध्ये दे. साकर्षा लाकुड आगारात असलेल्या दुचाकी व चारचाकी या भंगार वाहनांची विक्री करावयाची आहे. त्यामुळे या वाहनांबाबत कोणास काही आक्षेप नोंदवायचे असल्यास दि. 10 मार्च 2021 पुर्वी या कार्यालयास लेखी स्वरुपात कार्यालयीन वेळेत सादर करण्यात यावे. वाहनाचा प्रकार टाटा 407 वाहन क्र. एम एच 30 बी 2756, चेसिस नंबर 01050621966 इंजिन नंबर टी वाय पी ई 4978 पी 21 जे 10799040, जिप ट्रॅक्स वाहन क्र. एम एच 28 ऐ 8202, हिरो होंडा मोटार सायकल इंजिन नंबर एम बी एल 10 ई ई 89 सी 49434 असा आहे, असे उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here