Home Breaking News फेब्रुवारीत 11 बळी, कोरोनाने जिल्ह्यातील 191 जण मृत्यूमुखी; 2144 रुग्ण घेत आहेत...

फेब्रुवारीत 11 बळी, कोरोनाने जिल्ह्यातील 191 जण मृत्यूमुखी; 2144 रुग्ण घेत आहेत उपचार

बुलडाणा,(जिमाका) दि.24: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2144 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1776 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 368 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 298 व रॅपीड टेस्टमधील 70 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1061 तर रॅपिड टेस्टमधील 715 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1776 अहवाल निगेटीव्ह आहेत.

पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली शहर : 43, चिखली तालुका : हातणी 1, कोलारा 12, अंत्री खेडेकर 1, धोडप 1, दे. धनगर 5, शेलूद 2, मंगरूळ नवघरे 2, इसरूळ 2, मुरादपूर 1, वळती 2, खैरव 3, धोत्रा भणगोजी 1, भाणखेडा 2, अंचरवाडी 2, सवणा 1, खंडाळा 1, मेरा खु 1, वाघोरा 1, सावरगांव डुकरे 3, तेल्हारा 1, भोरसा भोरसी 1, दहीगांव 3, अमडापूर 1, आमखेड 1, गजरखेड 3, सिं. राजा शहर : 2, सिं. राजा तालुका : रताळी 1, मोहाडी 1, भरोसा 2, दुसरबीड 1, खैरखेड 1, सातेगांव 1, खामगांव शहर : 27, खामगांव तालुका : हिवरखेड 18,बोथाकाजी 1,बोरी अडगांव 3,अंत्रज 6, भालेगांव 1, रोहणा 1, सुटाळा बु 1, घाटपुरी 1, पिंप्राळा 1, बुलडाणा तालुका : अजिसपूर 1, माळवंडी 2, बिरसिंगपूर 1, दहीद बु 2, साखळी 1, सागवन 1,गिरडा 1, दत्तपूर 1, मोंढाळा 1, बुलडाणा शहर : 49, शेगांव शहर : 31, शेगांव तालुका : जानोरी 9, जवळा 2, चिंचोली 1, संग्रामपूर तालुका : सोनाळा 1, लोणार शहर : 1, लोणार तालुका : आरडव 1, मेहकर शहर : 1, मेहकर तालुका : बाऱ्हई 2, जानेफळ 19, हिवरा आश्रम 1, जळगांव जामोद शहर : 14, जळगांव जामोद तालुका : सुनगांव 1, कुरणगड 4, दे. राजा शहर : 15, दे. राजा तालुका : वाढोणा 1, चिंचोली बुरूकुल 1, आळंद 1, दे. मही 2, डोढ्रा 1, नांदुरा शहर : 15, नांदुरा तालुका : पोटळी 1, चांदुर बिस्वा 1, नारखेड 1, माळेगांव गोंड 1, मोताळा तालुका : मूर्ती 2, सिंदखेड 1, मोताळा शहर : 1, मलकापूर शहर : 1, मूळ पत्ता पुसद जि. यवतमाळ 1, जाळीचा देव जि. जालना 2 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 368 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान तेल्हारा ता. चिखली येथील 65 वर्षीय पुरूष, टाकरखेड वायाळ ता. दे. राजा येथील 67 वर्षीय महिला, धोत्रा भणगोजी ता. चिखली येथील 80 वर्षीय महिला व जाळीचा देव ता. भोकरदन जि. जालना येथील 55 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

तसेच आज 123 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव : 13, बुलडाणा : अपंग विद्यालय 34, दे. राजा : 21, चिखली : 37, मलकापूर : 14, नांदुरा : 1, मेहकर : 4.

तसेच आजपर्यंत 124938 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14945 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 14945 आहे.

आज रोजी 6332 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 124938 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 17280 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 14945 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 2144 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 191 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here