Home Breaking News शेगावकरांनो सावधान, तिन दिवसात पाॅझिटिव्ह रूग्णांचा इतका

शेगावकरांनो सावधान, तिन दिवसात पाॅझिटिव्ह रूग्णांचा इतका

शेगाव :गत तीन दिवसात कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांचा आकडा शंभरावर गेला असून शेगावकर जनतेने वेळीच सावध होणे गरजेचे आहे. शेगाव शहरासह तालुक्यात दोन दिवस सलग 43 व 44 व आज 31 असे पाॅझिटिव्ह रूग्ण निघाले.आजच्या दिवशी हा आकडा शंतकपार झाला आहे.
शहरातील लग्न समारंभ,धार्मिक, सामाजिक,राजकीय कार्यक्रमांची गत महिनाभरात चांगलीच रेलचेल झाली.गर्दीने जणू उच्चांक गाठला होता.त्यामुळे कोरोना ने शहरात व ग्रामीण भागात पुन्हा डोके वर काढले.संसर्ग झपाट्याने वाढत असून प्रत्येकाने सुरक्षित राहणे गरजेचे आहे. घराबाहेर निघाले ना मग मास्क लावा,सुरक्षित अंतर ठेवा,काळजी घ्या,शासनाने दिलेल्या सुचना व नियमाचे पालन करा,असे आवाहन तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी शहरासह तालुक्यातील जनतेला केले आहे.
शहरात कोरोना संक्रमणाचा वाढता धोका लक्षात घेवून मंगळवारी आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु तरीही बाजारात काही नी दुकाने थाटल्याने तहसीलदार शिल्पा बोबडे यांचेसह ठाणेदार संतोष ताले ,न प मुख्याधिकारी डाॅ प्रशांत शेळके यांनी रस्त्यावर येवून लोकांना सुचना केल्यात,नियमाचे उल्लंघन करणार्यावर कारवाई सुध्दा केली.आज दिवसभर होटेल,किराणा दुकान, मेडिकल, दवाखाने,बॅका,पतसंस्था,शासकीय कार्यालये वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद होती.

नागरीकासह नोकरदार वर्गाकडून नियमांचे उल्लंघन

शासकीय कार्यालयाचे ठिकाणी मात्र नागरिकांची विविध कामानिमित्ताने दिवसभर वर्दळ होती,अनेकजणाकडून नियमाचे उल्लंघन होतांना दिसून येत होते.यात अनेक शासकीय कर्मचारी सुध्दा नियम पाळताना दिसून आले नाहीत.

घराबाहेर निघाले की, मग मास्क लावा,सुरक्षित अंतर ठेवा,काळजी घ्या,शासनाने दिलेल्या सुचना व नियमाचे पालन करावे.
-तहसीलदार शिल्पा बोबडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here