Home कोरोना अपडेट्स जळगाव जामोद दुय्यम निबंधक कार्यालय येथे कोविड नियमाचे उल्लंघन

जळगाव जामोद दुय्यम निबंधक कार्यालय येथे कोविड नियमाचे उल्लंघन

 

जळगाव जा तालुका प्रतिनिधी :-
जळगाव जामोद तालुक्यातील मध्ये कोरोणाचा मोठा कहर चालू असताना जळगाव जामोद येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे तरी यासाठी खरेदी विक्रीसाठी लोक तालुक्यातून खेड्यापाड्यातून तहसील जळगाव जामोद येथे येत असतात परंतु शहरांमध्ये लॉकडाऊन असताना दुय्यम निबंधक कार्यालय येथे कोणत्या प्रकारचे नियमाचे पालन केल्या जात नाही व गर्दी मोठ्या प्रमाणात दिसत आहे व परिसरात कोणत्याही कर्मचाऱ्याचे गर्दीवर नियंत्रण करताना किंवा कुठे साने टायझर वापर करताना दिसत नाही व दुय्यम निबंधक कार्यालय येथे लोकांची गर्दी असताना दुय्यम निबंधक कार्यालय मध्ये चक्क कुत्रे झोपलेले आढळून आले याबाबत दुय्यम निबंधक यांना विचारणा केली असता गर्दी तर होणारच व ऑफिस आजच खुले आहे त्यामुळे गर्दी तर होणारच असे अधिकाऱ्यांनी बोलण्यात आले व ऑफिसमध्ये शिपाई नाही असे सांगितले व कर्मचाऱ्याकडून ऑफिसमध्ये खरेदी-विक्री चालू असताना सोशल डिस्टिंक्शन चे कोणतेच पालन होताना दिसत नाही व शहरात लोक मोठ्या प्रमाणात फिरत आहे व या कार्यालयात भरपूर प्रमाणात गर्दी होत आहे व ज्यांची खरेदी आहे त्यांनाच बोलवावे व त्यांना त्यांचा नंबर देऊन खरेदी विक्रीसाठी बोलवावे असे नागरिकांचे बोलण्यात येत आहे आहे तरी याबाबत शासनाचे दुर्लक्ष होत आहे का असे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here