Home कोरोना अपडेट्स कोरणा महामारीच्या पार्श्र्वभूमीवर स्वाभिमानीचा ट्रॅक्टर मोर्चा तुर्त स्थगित. प्रशात डिक्कर

कोरणा महामारीच्या पार्श्र्वभूमीवर स्वाभिमानीचा ट्रॅक्टर मोर्चा तुर्त स्थगित. प्रशात डिक्कर

संग्रामपुर :  कोरोणाचा वाढता संसर्ग लक्षात घेता २४ फेब्रुवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांचे उपस्थित होणारा संग्रामपुर येथील ट्रॅक्टर मोर्चा तूर्त स्थगित करण्यात आला आहे. अशी माहिती विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली‌. शेतकरी शेतमजूर सामान्य जनता यांच्या न्याय हक्कासाठी प्रथमच खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत संग्रामपूर तहसील कार्यालयावर पिक विमा,कोरोणा काळातिल विज बिल माफ करा, शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा व ईतर मागणीसाठी भव्य ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चा भव्यदिव्य काढून प्रशासनाची झोप उडवण्यासाठी स्वाभिमानीचे कार्यकर्ते गेल्या एक महिन्यापासून परिश्रम घेत होते. तयारी अंतिम टप्प्यात असतांनाच कोरोणाचा उद्रेक झाला आहे. शासन प्रशासनाने केलेल्या विनंतीला मान देऊन सदर मोर्चा पुढे ढकलण्यात आल्याची भूमिका आमचे नेते राजू शेट्टी यांनी आज जाहीर केली. कोरोणा रोखणे प्रथमच कर्तव्य समजून हा ट्रॅक्टर मोर्चा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा आज स्वाभिमानीच्या वतीने विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी केली असून मोर्चा जरी रद्द झाला तरी कोरणा महामारी आटोक्यात आल्यानंतर पुन्हा नव्या दमाने आंदोलनाचे आयोजन करूच अशी माहिती स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here