Home बुलढाणा जिल्हा कोरोना अपडेट आज 368 कोरोना बाधीत, असे आहेत तालुका निहाय रुग्ण

आज 368 कोरोना बाधीत, असे आहेत तालुका निहाय रुग्ण

बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढती संख्या चिंतेत घालणारी असून रोज आकडेवारी वाढतच आहे. शहर आणि ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. दरम्यान आज अखेरीस( 23 फेब्रुवारी रात्री 12 ची आकडेवारी) 368 रुग्ण समोर आले आहेत.

कोरोना आकडेवारी कमी झाल्याने जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली होती. मात्र फेब्रुवारीच्या 10 तारखेपासून रुग्ण वाढू लागले आहेत. 10 फेब्रुवारी रोजी 59 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते, 14 फेब्रुवारी 110, 17 फेब्रुवारी रोजी 199, 18 फेब्रुवारी 134, 19 फेब्रुवारी रोजी 271, 20 फेब्रुवारी रोजी 215, 22 फेब्रुवारी 350, तर काल सर्वाधिक 416 रुग्ण आढळून आले. मंगळवारी जळगांव जामोद तालुक्यातील झाडेगाव मध्ये 141 रुग्ण आढळले, त्यामुळे हे गाव सील करण्यात आले आहे. जिल्हात कोरोना रुग्णाचा आकडा वाढत गेला आणि शेवटी प्रशासनाला जिल्ह्यातील सर्वच 13 तालुक्यात निर्बंध घालावे लागले आहेत.

असे आहेत तालुका निहाय रुग्ण

बुलडाणा जिल्ह्यात आज 368 इतक्या रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे.
▪️बुलडाणा: 74 ▪️खामगाव: 61
▪️शेगाव : 44 ▪️दे. राजा : 21
▪️चिखली : 90 ▪️मेहकर : 22
▪️मलकापूर: 00▪️नांदुरा : 26
▪️लोणार : 01▪️मोताळा : 04
▪️सि. राजा : 04▪️जळगाव जा.: 19
▪️संग्रामपूर : 00
▪️सिद्धिविनायक सेंटर : 06

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here