Home कृषि वार्ता राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेत आता अनुदान, अर्ज करण्याचे आवाहन

राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेत आता अनुदान, अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 23 : जिल्ह्याकरीता राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत मुरघास निर्मिती करीता सायलेज बेलर मशिन युनीट स्थापन करण्यात येणार आहे. या मशिनसाठी जिल्ह्यातील सहकारी दुध उत्पादक संघ, संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता बचत गट व गोशाळा, पांजरपोळ, गौरक्षण संस्था यांना सदर योजनेचा लाभ द्यावयाचा आहे. या योजनेसाठी प्रति युनीट 20 लक्ष रूपये खर्चापैकी 50 टक्के 10 लक्ष रूपये केंद्र शासनाचे अर्थ सहाय्य राहणार आहे. उर्वरित 50 टक्के 10 लक्ष रूपये संस्थेने स्वत: खर्च करावयाचे आहे. सदरचा निधी हा सर्वसाधारण योजनेतील असल्याने योजनेकरीता जिल्ह्यामध्ये एक युनीट स्थापन करावयाचे आहे. तरी सर्वसाधारण प्रवर्गातील संस्थांनीच अर्ज सादर करावे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 10 मार्च 2021 आहे. अर्ज पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध आहे, तरी पात्र संस्थांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. जी बोरकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here