Home बुलढाणा जिल्हा कोरोना अपडेट जिल्ह्यात सध्या 1903 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू; वाचा.. कोणत्या गावात किती...

जिल्ह्यात सध्या 1903 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू; वाचा.. कोणत्या गावात किती रुग्ण

 

बुलडाणा,(जिमाका) दि.23 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2049 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1633 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 416 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 334 व रॅपीड टेस्टमधील 82 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 808 तर रॅपिड टेस्टमधील 825 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1633 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : जळगांव जामोद तालुका : झाडेगांव 141, आसलगांव 6, मोताळा शहर : 3, मोताळा तालुका : मूर्ती 4, थड 2, सिंदखेड 2, बुलडाणा शहर : 62, बुलडाणा तालुका : येळगांव 1, केसापूर 1, पाडळी 1, सुंदरखेड 1, देऊळघाट 2, पिंपळगावं सराई 1, सागवन 4, मेहकर तालुका : जानेफळ 1, शेगांव तालुका : जानोरी 7, चिंचोली 1, तळेगांव 1, शेगांव शहर : 31, खामगांव शहर : 7, चिखली तालुका : तांबुळवाडी 1, सावरगांव डुकरे 1, अमडापूर 1, मेरा खु 1, भालगांव 1, शेलूद 1, खैरव 1, जांभोरा 2, पळसखेड दौलत 5, पेनसावंगी 1, कव्हाळा 3, तेल्हारा 1, शेलूद 1, दहीगांव 1, मंगरूळ नवघरे 1, सोमठाणा 1, आमखेड 1, सवणा 1, चिखली शहर : 23, दे. राजा शहर : 22, दे. राजा तालुका : सिनगांव जहागीर 5, डोढ्रा 2, गारगुंडी 1, किन्ही 1, दे. मही 5, लोणार तालुका : येवती 6, हिरडव 1,भानापूर 1, नायगांव 1, पिंपळनेर 1, नांद्रा 3, तांबोळा 1, सुलतानूपर 3, वेणी 1, लोणार शहर : 17, नांदुरा शहर : 1, मलकापूर शहर : 1, सिं. राजा शहर : 4, सिं. राजा तालुका : कि. राजा 1, संग्रामपूर तालुका : सोनाळा 1, बावनबीर 1, वरवट बकाल 1, मूळ पत्ता बीड 2, अजिंठा जि. औरंगाबाद 1, संजोळ ता. जाफ्राबाद जि. जालना 1, सौरभ कॉलनी अमरावती 1 येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 416 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 136 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव : 14, बुलडाणा : अपंग विद्यालय 37, दे. राजा : 11, जळगांव जामोद : 1, सिं. राजा : 6, चिखली : 48, शेगांव : 4, लोणार : 6, मलकापूर : 7, नांदुरा : 1,
तसेच आजपर्यंत 123462 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14822 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 14822 आहे.
आज रोजी 5030 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 123162 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 16912 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 14822 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1903 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 187 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

( मास्क वापरा, नियम पाळा, जबाबदार नागरिक बना)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here