बुलडाणा जिल्ह्यात आता सर्व नगर पालिका क्षेत्रात लॉकडाउन जाहीर झाले असून सातत्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे बुलडाणा जिल्ह्यातील उर्वरित आठही नगर पालीकांच्या हद्दीत आज मंगळवार सायंकाळी ६ वाजेपासून लॉकडाऊन घोषीत केले आहे. त्यामुळे आता 13 ही नगर पालिका हद्दीत लॉकडाऊन राहील.
त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शहरी भागातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आस्थापना आज सांयकाळी ६ वाजेपासून १मार्चचे सकाळी ८ वाजेपर्यंतबंद ठेवण्याचे आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत.
यासह यावर्षी २५ मार्चपासून सुरु होणा-या सैलानी यात्रेवरही जिल्हा प्रशासनाने बंदी घातल्याची माहीती अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.