Home Breaking News शेगाव पंचायत समितीचे शाखा अभियंता  ACB च्या जाळ्यात

शेगाव पंचायत समितीचे शाखा अभियंता  ACB च्या जाळ्यात

बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव पंचायत समिती मध्ये कार्यरत शाखा अभियंता गायकवाड यांना 7 हजार रूपयांची लाच घेताना बुलडाणा अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने काहीच वेळापूर्वी अटक केल्याची माहिती सुत्राकडून प्राप्त झाली आहे

पुढील कारवाई करण्यात येत आहे बुलडाणा एसीबीचे सलग दुसऱ्या दिवशी यशस्वी कारवाई झाली आहे. काल 22 फेब्रुवारीला सुद्धा बीबी येथे 300 रुपयांची लाच घेताना एका तलाठ्याला अटक करण्यात आले होते.

▶️ *युनिट -* बुलडाणा
▶️ *तक्रारदार-* पुरुष ,वय- 42 वर्षे रा. राहणार सांगावा तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा
▶️ *आरोपी-*
श्री. पुरुषोत्तम पांडुरंग गायकवाड, वय- 57 वर्षे, पद- शाखा अभियंता ,( वर्ग -3), नेमणूक-पंचायत समिती शेगाव, ता शेगाव, जि. बुलढाणा रा.- सुटाळा खु. ता- खामगाव जि. बुलढाणा.
▶️ *लाचेची मागणी*- 7500 /-रू, तडजोडी अंती – 7000/-रू
▶️ *लाच स्विकारली-* 7000 /रु.
▶️ *हस्तगत रक्कम-* 7000/-रु.
▶️ *लाचेची मागणी -*
ता.23/02/2021
▶️ *लाच स्विकारली -* ता. 23/02/2021
▶️ *घटनास्थळ*
पंचायत समिती शेगाव, ता. शेगाव, जि. बुलडाणा.
▶️ *लाचेचे कारण -*.
सन 2019 20 मध्ये सांगावा गट ग्रामपंचायत अंतर्गत एकफळ येथे अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेअंतर्गत हायमस्ट लाईट लावण्याचे काम घेण्यात आले होते सदर काम सन 2020 मध्ये पूर्ण झालेले आहे केलेल्या कामाचे बिल 1 ,43,700 रुपये झाले असून त्याचे 5% म्हणून 7,500/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 7000/-रुपये स्वीकारले
▶️हॅश व्हॅल्यू काढण्यात आली आहे.
▶️ *सापळा व मदत पथक-* पो.उपअधिक्षक श्री. आर. एन. मळघणे
पोलीस नाईक -श्री विलास साखरे, रविंद्र दळवी,विजय मेहेत्रे
चालक पो. शि. अरशद शेख
▶️ *मार्गदर्शन अधिकारी* :-
1) श्री. विशाल गायकवाड,
पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र.

2) श्री. अरुण सावंत,
अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,अमरावती परिक्षेत्र. 3) श्री. संजय चौधरी.
पोलीस उप अधिक्षक लचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा
▶️ *तपासी अधिकारी*
पो.उपअधिक्षक श्री. आर. एन. मळघणे

▶️ *आरोपीचे सक्षम अधिकारी-* मा. मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा .
————————————

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
*लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा*.
*संपर्क क्रमांक* – *8888768218*.
*9923406509*
*टोल फ्री क्रमांक* – *1064*.
————————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here