Home Breaking News याला काय म्हणाल , ‘कोणाचा’ बाजार?

याला काय म्हणाल , ‘कोणाचा’ बाजार?

शेगाव – कोरोनाची लाट आटोक्यात आणण्यासाठी अधिकारी, डॉक्टर , पोलीस जीव धोक्यात घालून अहोरात्र झटत आहेत, मात्र लोकं अजूनही सुधरायचे नाव घेत नाहीत याला काय म्हणावे, असा प्रश्न आता पडत आहे. दरम्यान आज मंगळवारी शेगावमध्ये आठवडी बाजार भरला, शेकडो लोक मास्क न का लावताच तसेच सोशल डिस्टशिंग न ठेवता फिरताना आढळून आले. या आता याला  **चा बाजार म्हणावे का? असे जागरुक नागरिक बोलत आहेत. दरम्यान एका नागरिकाने मुख्याधिकारी यांना माहितीवजा विचारणा केली असता त्यांनी ” आम्ही कालच सूचना दिल्या होत्या, जे बाजारात बसले त्यांनाच विचारा असे उत्तर दिले.””

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे, विना मास्क फिरता येत नाही, तरी सुद्धा आज लोकांनी शेगावच्या आठवडी बाजारात नियम धाब्यावर बसविले. स्थानिक, पोलिस नगर पालिका प्रशासनाने याकडे गंभीरपणे लक्ष दे देण्याची मागणी जागरूक नागरिक करत आहेत.

पुन्हा एकदा, पण हेही अवश्य वाचा….

बुलडाणा जिल्ह्यात लॉकडाऊनच्या नियमांमध्ये अंशतः बदल सोमवारी करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. बुलडाणा, चिखली, देऊळगावराजा, खामगाव आणि मलकापूर या पाच ठिकाणी नगर परिषद अंतर्गत कडक लॉकडाऊन जाहीर झाला आहे. याठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. आज दुपारी निघालेल्या आदेशात सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी अंशतः बदल केला आहे. त्यानुसार….

■ हॉटेल, रेस्टॉरंट यांना सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत उघडे ठेवता येईल पण केवळ घरपोच सुविधा देण्यासाठी.

■ सर्व खाजगी, वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सक सेवा नियमित वेळेनुसार सुरू राहतील.

■ कोणतेही रुग्णालय रुग्णांना सेवा नाकारणार नाही.

■ औषधी सेवा, ऍबुलन्स सेवा 24 तास सुरू राहतील.

■ पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस एजन्सी सुरू राहील.

■ पूर्वनियोजित परीक्षा वेळेनुसार होतील.

■ चिकन, मांस, अंडी विक्रीची दुकाने सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत सुरू राहतील.

■ कृषी सेवा केंद्र, कृषी प्रक्रिया उद्योग सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत सुरू राहतील.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here