Home जळगाव जामोद तालुका नगरपालिकेचा अर्थसंकल्प ‘खिसेकापू’ : महाविकास आघाडीचा आरोप

नगरपालिकेचा अर्थसंकल्प ‘खिसेकापू’ : महाविकास आघाडीचा आरोप

जळगांव जा./ राहुल निर्मळ
जळगाव जामोद नगरपरिषदेची अंदाजपत्रकीय ऑनलाईन सभा रद्द करण्याबाबत महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आले. उपविभागीय अधिकाऱ्यांन मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून नगरपालिकेचा अर्थसंकल्प ‘खिसेकापू’ असल्याची तक्रार व आरोप महाविकास आघाडीने केला आहे
२२ फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद नगर परिषदेची अर्थसंकल्पीय ऑनलाइन सभा घेण्यात आली होती. त्यावेळी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी सभा अध्यक्षा तथा नगराध्यक्ष सीमाताई डोबे यांना लेखी विनंती केली होती की ऑफलाइन सभा घेण्यात यावी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत ऑफलाइन सभा चालू असताना फक्त जळगाव जामोद नगर परिषदेमध्ये ऑनलाइन सभा का असा सवाल विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केला आहे.

मुख्याधिकारीच गायब

मागील सभेच्या वेळी महा विकास आघाडीने ऑफलाइन सभा घेण्याबाबत लेखी अर्ज दिला होता परंतु त्या अर्जाचा कोणताही विचार न करता याहीवेळी त्या अर्जाचा कोणताही विचार केला गेला नाही जळगाव जामोद शहराच्या पंचेचाळीस ते पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या अतिशय महत्त्वाच्या अर्थसंकल्पीय सभा असतानादेखील मुख्याधिकारी हे सभेला जोडल्या गेले नव्हते. त्यांना मुख्याधिकारी सभेला प्रत्यक्ष हजर नाही त्यामुळे सभा रद्द किंवा तहकूब करावी अशी मागणी केली परंतु सभा अध्यक्षांनी आमची मागणी फेटाळली व बहुमताच्या जोरावर सभा चालू करण्याचा प्रयत्न केला असता विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी त्याबाबत ऑनलाइन आवाज उचल्यामुळे सभा अध्यक्षांनी अंदाजे 30 मिनिटे सभेमध्ये गोंधळ चालू राहिला तिस मिनिटानंतर प्रभारी मुख्याधिकारी रमेश ढगे सभेमध्ये जोडल्या गेले.

गटनेते गजानन वाघ आक्रमक

गटनेते गजानन वाघ यांनी अतिमहत्‍वाचे समीकरणे आपण 30 मिनिटे उशिरा जोडले गेले व वेळेवर का हजर राहिले नाही याबाबत प्रतिप्रश्न केला त्याबाबत प्रभारी मुख्याधिकारी हे उडवाउडवीची उत्तरे द्यायला लागले होते यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेला सुध्दा मुख्याधिकारी गैरहजर होते त्यामुळे या अतिमहत्त्वाच्या अर्थसंकल्पीय सभा असल्याबाबत काँग्रेसचे गटनेते अर्जुन घोलप तथा नगर परिषद सदस्य श्रीकृष्ण केदार यांनी अर्थसंकल्पाचे अनेक प्रश्न विचारले परंतु मुख्याधिकारी व सभा अध्यक्षांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर शिक्षण सभापती रमेश ताडे यांनी अर्थसंकल्पामध्ये जनतेच्या हितासंबंधी कोणतीही तरतूद नसल्याचे स्पष्ट करून विरोध दर्शविला तसेच अर्थसंकल्पात जळगाव जामोद शहरातील अपंग व सुशिक्षित बेरोजगारांना बाबत बजेटमध्ये काहीच तरतूद का केली नाही असा सवाल गजानन वाघ यांनी विचारला असता त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली.

जळगाव जामोद करमुक्त केव्हा?

नगरपरिषद निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे आमदार डॉ संजय कुटे यांनी करमुक्त नगरपालिका करण्याचे आवाहन करून भाजपाला सत्तेत बसविले परंतु त्याला चार वर्षे पूर्ण होऊन सुद्धा जळगाव जामोद शहर करमुक्त झाले नाही या अर्थसंकल्पामध्ये अशा प्रकारची कोणतीही तरतूद नाही उलट शंभर रुपये घरपट्टी होती ती वाढवून एक हजार ज्याची एक हजार होती ते दहा हजार वाढवून जनतेची फसवणूक केली त्यामुळे जोपर्यंत अर्थसंकल्पामध्ये जनतेच्या विविध प्रश्नांवर चर्चा होत नाही तोपर्यंत सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन जळगाव जामोद येथील महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन दिले आहे. निवेदन देतेवेळी नगरसेवक गजानन वाघ,गटनेता अर्जुन घोलप, शिक्षण सभापती रमेश ताडे,संजय भुजबळ,युवराज देशमुख यांची उपस्थिती होती.

(या बातमीवर नगराध्यक्ष काय प्रतिक्रिया देतात, हे सुद्धा आम्ही आपल्याला कळवू, आम्ही एकतर्फी बातम्या देत नाही, खंडण आणि मांडण असे धोरण आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here